मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock : 8.86 रुपयांचा शेअर 886 रुपयांवर; 1 लाख बनले 1 कोटी

Multibagger Stock : 8.86 रुपयांचा शेअर 886 रुपयांवर; 1 लाख बनले 1 कोटी

गेल्या एका वर्षात United Spirits  शेअर सुमारे 567 रुपयांवरून 886 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत 115 टक्‍क्‍यांनी वाढीसह शेअरधारकांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

गेल्या एका वर्षात United Spirits शेअर सुमारे 567 रुपयांवरून 886 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत 115 टक्‍क्‍यांनी वाढीसह शेअरधारकांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

गेल्या एका वर्षात United Spirits शेअर सुमारे 567 रुपयांवरून 886 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत 115 टक्‍क्‍यांनी वाढीसह शेअरधारकांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : युनायटेड स्पिरिट्सचे (Unites Spirits) शेअर्स हे दर्जेदार शेअर्सपैकी एक आहेत ज्यांनी त्यांच्या भागधारकांना दीर्घ कालावधीत भरपूर परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकवर (Multibagger Stock) गेल्या एका महिन्यापासून विक्रीचा दबाव आहे, परंतु ज्या गुंतवणूकदारांनी (Investors) या स्टॉकमध्ये खरेदी केली आणि विसरून जा या धोरणाचा अवलंब केला, त्यांचे पैसे या स्टॉकने अनेक पटींनी वाढवले आहेत. गेल्या 20 वर्षात हा स्टॉक 8.86 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 886.75 रुपयांच्या पातळीपर्यंत वाढला आहे. म्हणजेच 20 वर्षांत शेअर जवळपास 100 पटीने वाढला आहे.

युनायटेड स्पिरिट्स स्टॉकच्या किमतीच्या प्राईज हिस्ट्रीवर (Unites Spirits Price History) नजर टाकल्यास हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून प्रॉफिट-बुकिंगच्या  (Profit Booking) दबावाखाली आहे, ज्यामुळे गेल्या एका महिन्यात यात 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. युनायटेड स्पिरिट्सच्या शेअरची किंमत गेल्या 6 महिन्यांत सुमारे 612 वरून 886 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत त्यात 45 टक्के वाढ झाली आहे.

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

गेल्या एका वर्षात हा शेअर सुमारे 567 रुपयांवरून 886 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत 115 टक्‍क्‍यांनी वाढीसह शेअरधारकांचे पैसे दुप्पट झाले आहेत. युनायटेड स्पिरिट्सच्या शेअरची किंमत गेल्या पाच वर्षांत प्रति शेअर 380 रुपयांवरून 886 रुपयांपर्यंत वाढली आहे.

SBI, BPCL आणि DEVYANI INTL आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसचा गुंतवणूकीचा दृष्टिकोन

युनायटेड स्पिरिट्सच्या शेअरची किंमत गेल्या 20 वर्षांत 8.86 रुपयांवरून 886.75 रुपयांपर्यंत वाढली आहे. शेअरची किंमत जवळजवळ 100 पट वाढली आहे. युनायटेड स्पिरिट्समध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 91000 झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 1.45 लाख झाले असते.

एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 1.56 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख 2.15 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 20 वर्षांपूर्वी 8.86 रुपये प्रति शेअर देऊन 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये सुमारे 1 कोटी रुपये झाले असते.

एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी गुंतवणूकदारांना मॅकडोवेलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देताना सांगितले की, "युनायटेड स्पिरिट्स किंवा मॅकडॉवेलच्या शेअर्सची किंमत आणखी वाढू शकते. हा स्टॉक 850 रुपयांच्या स्टॉपलॉससह 940-980 रुपयांच्या पातळीवर खरेदी केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Investment, Money, Share market