मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

 पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्यासाठी, गृहकर्जावरच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. याशिवाय उद्यापासून एलपीजी (LPG) सिलिंडरचे दर वाढण्याचीही शक्यता आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : उद्यापासून (1 डिसेंबर 2021) दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी आजच पूर्ण कराव्या लागणार आहेत. उदा. पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्यासाठी, गृहकर्जावरच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. याशिवाय उद्यापासून एलपीजी (LPG) सिलिंडरचे दर वाढण्याचीही शक्यता आहे.

गॅस सिलिंडरचे दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. व्यावसायिक (Commercial) आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर (Gas cylinder rate) महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केले जातात. त्यामुळे उद्या, 1 डिसेंबरला सकाळी या महिन्यासाठीचे नवीन दर जाहीर केले जातील.

एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO

यूएएन (UAN) आणि आधार लिंकिंग

तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे ईपीएफचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत तो आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक आहे. 1 डिसेंबर 2021 पासून कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ईसीआर (Electronic Currency Low Returns) दाखल करण्यास सांगितलं गेलं आहे, ज्यांचं यूएएन (UAN) आणि आधार लिंकिंग (Aadhar linking) व्हेरिफाय झालं आहे. जे कर्मचारी उद्यापर्यंत हे दोन्ही क्रमांक लिंक करू शकणार नाहीत त्यांना ईसीआरदेखील दाखल करता येणार नाही.

होम लोन ऑफर

सणासुदीच्या काळात बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर्स आणल्या होत्या. त्यामध्ये प्रोसेसिंग फी माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या ऑफर्स 31 डिसेंबर रोजी संपत आहेत; मात्र, एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स ऑफर 30 नोव्हेंबरला संपत आहे.

एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड

तुम्ही एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल, तर 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणंही महाग होणार आहे. अगोदर ईएमआयवर फक्त व्याज द्यावं लागतं होतं. उद्यापासून मात्र प्रोसेसिंग फीदेखील द्यावी लागणार आहे.

मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत शाळा, आयुक्तांनी दिली नवी तारीख

लाइफ सर्टिफिकेट

तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट जमा करणं बंधनकारक आहे. पेन्शनधारकांनी आज किंवा उद्या या दोन दिवसांत त्यांचं लाइफ सर्टिफिकेट सादर करावं. अन्यथा 1 डिसेंबरपासून पेन्शन मिळणं बंद होईल.

वरील सर्व गोष्टींच्या आधारे 1 डिसेंबरपासून आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे आर्थिक बदल होऊ शकतात. त्यामुळे ज्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे, ती नक्की करून घ्यावी.

First published:

Tags: Money, बँक