स्वस्तात सोनं खरेदी करण्याची वर्षातील शेवटची संधी, ऑनलाइन पेमेंटवर मिळेल अतिरिक्त डिस्काउंट

स्वस्तात सोनं खरेदी करण्याची वर्षातील शेवटची संधी, ऑनलाइन पेमेंटवर मिळेल अतिरिक्त डिस्काउंट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) चा नववा हप्ता जारी करणार आहे. याअंतर्गत तुम्हाला स्वस्तात सोनेखरेदीची सुवर्णसंधी मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 28 डिसेंबरपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond) नववी सीरिज जारी केली जाणार आहे. या सीरिजसाठी गोल्ड बाँडची इश्यू प्राइज 5000 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या या सीरिजचे (Sovereign Gold Bond Scheme 2020-21) सब्सक्रिप्शन 28 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार असल्याची माहिती RBI ने दिली आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत ही सब्सक्रिप्शन खरेदी करता येणार आहे.

सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

(हे वाचा-बापरे! 2020 मध्ये सोन्याचे दर 28 टक्क्यांनी वाढले, पुढील वर्षी काय असतील किंमती)

ऑनलाइन पेमेंट केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅम सूट

SGB साठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यानंतर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत देखील देण्यात येईल. अर्थात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी ही किंमत 4,950 रुपये असेल. अर्थात सध्याच्या मार्केट प्राइसपेक्षा कमी दरात तुम्ही हे सोनं खरेदी करू शकता. याआधीच्या आठव्या सीरिजची किंमत 5,177 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. याकरता 9 नोव्हेंबर रोजी सब्सक्रिप्शन उघडण्यात आले होते.

कमीतकमी ते जास्तीत जास्त किती करता येईल खरेदी?

सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये वैयक्तिक स्वरुपात कमीत कमी 1 ग्रॅम तर जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक करता येते. या बाँडच्या मॅच्यूरिटीचा कालावधी 8 वर्षांचा असतो. मात्र यामध्ये गुंतवणुकीनंतर पाचव्या वर्षी स्कीममधून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असतो. बाँडची विक्री वैयक्तिक स्वरुपात भारतातील रहिवाशांना (Indian Citizens), हिंदू अविभाजित कुटुंबाना (HUF), ट्रस्ट्स, विश्वविद्यालयांना केली जाते.

(हे वाचा-स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! वाचा काय आहे पंजाब नॅशनल बँकेची योजना)

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये 2.5 टक्क्यांचे व्याज मिळते. गोल्ड बाँडमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे याच्या स्टोअरेजची चिंता करावी लागत नाही. डिमॅटमध्ये ठेवल्यास याकरता कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही. जर गोल्ड बाँडच्या मॅच्यूरिटीवर कोणताही कॅपिटल गेन्स बनला तर यावर सूट मिळते. गोल्ड बाँडवर हा एक्सक्लूझिव्ह लाभ मिळतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 25, 2020, 10:02 AM IST

ताज्या बातम्या