ट्रेंट ब्रीज, 14 जून : ICC Cricket World Cupमध्ये गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान हा वर्ल्ड कपच्या इतिहासतला पावसामुळं रद्द झालेला चौथा सामना आहे. त्यामुळं चाहते आयसीसीवर चांगले नाराज आहेत. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना नाणेफेक न होताच रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. मात्र सोशल मीडियावर सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग यांच्या लेकीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. धोनीची लेक झिवा ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर सामना रद्द झाल्यानंतर रडताना दिसली. त्यानंतर फॅन्सनी आयसीसीवर टीका करण्यास सुरुवात केली. तर, काही चाहत्यांनी झिवा सारखेच आमचेही हाल असल्याचे मत व्यक्त केले आहे.
#TeamIndia Fans Reaction Now. 😂
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) June 13, 2019
Cutest ZIVA 😍❤️ pic.twitter.com/dLuIibDYAY
काही चाहत्यांनी आपल्या वडिलांना खेळताना पाहायचे होते. झिवा सारखीच आमचीही अवस्था आहे.
#TeamIndia Fans Reaction Now. 😂
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) June 13, 2019
Cutest ZIVA 😍❤️ pic.twitter.com/dLuIibDYAY
आयसीसीच्या नियोजनाचा फटका
ICC Cricket World Cup स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या 18 सामन्यापैकी 4 सामने पावसाने रद्द करावे लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाला. यामुळे आयसीसीवर टीका केली जात आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात असताना हवामानाचा अंदाज नव्हता का? वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सामने रद्द होण्याचा विक्रम झाला आहे. याआधी 1992 आणि 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 2 सामने रद्द झाले होते. वर्ल्ड कपची रंगत वाढत असतानाचा पावसाने त्याचा बेरंग केल्याचं चित्र आता दिसत आहे. अनेकांनी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यानंतर एक दिवस राखीव हवा असं म्हटलं आहे. मात्र, आयसीसीने अर्थिकदृष्ट्या मोठ्या स्पर्धेत हे शक्य नसल्याचं स्पष्ट केल आहे.
वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा
वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!
वाचा-ICC च्या नियोजनाचा फटका, World Cup चं स्वप्न राहणार अधुरं!
उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी