मॅंचेस्टर, 14 जून : ICC World Cupमध्ये यंदा पावसामुळं तब्बल चार सामने रद्द झाले. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना अटीतटीचा होणार यात काही वाद नाही. मात्र, भारताचेच पारडे जड असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिस यानं पाकिस्तानला विजयाचा मंत्र दिला होता. मात्र, आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं भारताची स्ट्रॅटर्जी सांगितली आहे.
विराटसेना यंदाच्या वर्ल्ड कप मधला विजयचा प्रबळ दावेदार आहे. भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारली तर, न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाले. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तानचा संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून त्यांना मानहाणीकारक पराभव स्विकारावा लागला होता. दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीनं पाकिस्तानला पराभूत करण्याचा प्लॅन सांगितला. कोहलीनं, ''पाकिस्तान हा आमचा कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे. जगभरातील चाहत्यांनाही या सामन्याची उत्सुकता लपवता येत नाही. या अशा महत्त्वाच्या सामन्याचा सदस्य असल्याचा मला अभिमान वाटतो. या सामन्यात आम्ही आमच्यातील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू’’, असे म्हणत, “या सामन्यात मानसिक कणखरता सर्वात महत्त्वाची आहे. असे देखील सांगितले. मैदानावर उतरून आम्हाला केवळ रणनीतीची अंमलबजावणी करायची आहे, त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील असू”, असेही कोहली म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट
भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी क्रिकेट फॅन्सना मोठा फटका बसणार आहे. आताच्या हवामानानुसार मॅंचेस्टरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता, पावसाची शक्यता 50 % आहे. मॅंचेस्टरमध्ये सकाळपासून-संध्याकाळपर्यंत पाऊस वर्तवण्यात आला आहे. 16 जूनला म्हणजे सामन्यादिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. सकाळी 9, 11 आणि दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सगळ्यात वाईट बातमी म्हणजे इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅंचेस्टर शहरात पडला आहे. त्यामुळं या सामन्याला पावसाचा फटका बसणार असे चित्र दिसत आहे.
वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा
वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!
वाचा- 'भारताला हरवणे सोपे', वकार युनिसनं पाकिस्तानला कानमंत्र दिला
उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी