काय असतो Google Tax? कसा होईल तुमच्यावर परिणाम?

काय असतो Google Tax? कसा होईल तुमच्यावर परिणाम?

Union Budget 2019 - भारतात मोठी कमाई करणाऱ्या डिजिटल स्ट्रीमिंग कंपनींवर मोठा कर बसू शकतो

  • Share this:

मुंबई, 29 जून : भारतात मोठी कमाई करणाऱ्या डिजिटल स्ट्रीमिंग कंपनींवर मोठा कर बसू शकतो. टॅक्स डिपार्टमेंट नेटफ्लिक्स आणि अमेझाॅन प्राइमसारख्या डिजिटल कंपनींवर टॅक्स लावण्याच्या तयारीत आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही. या कंपन्यांना जाहिरात देणाऱ्यांवर होणार. CNBC आवाजच्या सूत्रांच्या माहितीनुसार बजेटमध्ये Equalisation Levy  वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. हा Equalisation Levy 2017मध्ये लागू झालेला.

काय आहे सरकारचा प्लॅन?

डिजिटल स्ट्रीमिंग कंपनींवर Equalisation Levy लागू होऊ शकतो

Netflix, Amazon Prime सारख्या कंपनींवर कर लागू होऊ शकतो.

गुगल टॅक्समध्ये वाढ होऊ शकते. Equalisation Levy गुगल टॅक्स नावानं ओळखला जातो

बजेटमध्ये Equalisation Levy वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे

Equalisation Levy 2017पासून लागू आहे

SBI च्या डेबिट कार्डानं बुक करा विमानाचं तिकीट, मिळवा 'इतका' डिस्काउंट

भारतीय नौदलात 2700 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

गुगल टॅक्स काय आहे?

एकेकाळी गुगल टॅक्सनं आॅनलाइन जगात मोठी खळबळ माजवली होती. आॅनलाइन जाहिरात देणाऱ्या कंपन्यांवर कर लागतो. अनेक टेक्नाॅलाॅजी कंपनी आपल्या जाहिराती आॅनलाइनच देत असतात. या गुगल टॅक्सद्वारे या कंपनींना सरकार टॅक्सच्या परिघात आणतं.

कमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा 'हा' व्यवसाय

म्हणजे फेसबुक आणि गुगलवर जे जाहिरात देतात, त्यांना कर भरावा लागतो. गुगलसारखी कंपनी सर्च आणि आॅनलाइनवरही पैसे मिळते. म्हणून या कंपन्यांना इंटरनेटमुळे जो फायदा होतो,  त्यावर सरकारनं टॅक्स लावलाय.

भारतीय कंपन्या गुगल किंवा फेसबुकवर आपली जाहिरात देतात. सरकार त्यावर टॅक्स लावतं. युरोपमध्येही हीच पद्धत आहे.

VIDEO : पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर

First published: June 29, 2019, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading