कमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा 'हा' व्यवसाय

कमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा 'हा' व्यवसाय

New Business, Government Scheme - यात नुकसान खूपच कमी आणि योग्य मार्केटिंग केलंत तर तुम्ही चांगली कमाई करू शकता

  • Share this:

मुंबई, 29 जून : तुम्हाला व्यवसाय करायचाय? तर मग स्कूल बॅग तयार करण्याची फॅक्टरी सुरू करू शकता. यात नुकसान खूपच कमी आणि योग्य मार्केटिंग केलंत तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.

या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त पैशाचीही गरज लागणार नाही. तुमच्याकडे 10 ते 12 लाख रुपये असतील तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे पैसे नसतील तर सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. जाणून घ्या या व्यवसायाबद्दल -

LIC परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड आज मिळणार,'असं' करा डाउनलोड

इतक्या पैशात सुरू करा व्यवसाय

एनएसआयसीनं तयार केलेल्या प्रोजेक्टप्रमाणे तुम्ही वर्षात 15 हजार बॅग तयार करणारी फॅक्टरी सुरू करणार असाल तर मशीनरी, वर्किंग कॅपिटल, कच्चा माल आणि इतर खर्च धरून जवळजवळ 11 लाख 55 हजार रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

'ही' आहेत भारतातली महागडी शहरं, मुंबईचा कितवा नंबर?

गरज एवढ्या जागेची

रिपोर्टप्रमाणे दर वर्षी 15 हजार बॅग तयार करणाऱ्या युनिटसाठी तुम्हाला जवळजवळ 120 स्क्वेअर मीटर जागेची गरज लागेल. वीज 2 किलोवॅट ते 5 किलोवॅट लागेल. पाण्याचं नाॅर्मल कनेक्शननं चालू शकेल.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

70 ते 80 टक्के मिळू शकतं कर्ज

सरकार तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज देईल. तुम्ही या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून बँकेला देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. बँक तुम्हाला 70 ते 80 टक्के कर्ज देईल.पंतप्रधानांची मुद्रा योजना फायदेशीर आहे.

कुठली मशीन्स आणि कच्च्या मालाची गरज आहे?

मशीनरीमध्ये सिंगल निडल फ्लॅट बेड शिवण मशीन, स्क्रीन प्रिंटिंग साधनं, डिझाइन कापड, नायलाॅन स्ट्रेप, डी-रिंग, झिप, धागे, बक्कल, लाॅक्स, पॅकिंग मटेरियल इत्यादी गोष्टी लागतील.

किती असेल कमाई?

प्रत्येक बॅगेची वेगवेगळी किंमत ठेवता येईल. पण सरासरी किंमत 100 रुपये ठेवता येईल. मग 15 हजार बॅग्ज विकून  15 लाख रुपये मिळतील. तुमची गुंतवणूक 11 लाख 55 हजार रुपये आहे. म्हणजे तुम्ही वर्षाला 3 लाख 45 हजार रुपये कमावले. पुढच्या वर्षी मशीन्सचा खर्च कमी झाला की कमाई जास्त होईल.

भररस्त्यात महिलांचं हमरी-तुमरी, तुंबळ मारहाणीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: business
First Published: Jun 29, 2019 02:54 PM IST

ताज्या बातम्या