मुंबई, 29 जून : देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )च्या खातेधारकांसाठी खुशखबर. तुम्ही SBI डेबिट कार्डाद्वारे फ्लाइट तिकीट बुक केलंत तर 8 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी यात्राच्या मान्सून सेलमध्ये SBI डेबिट कार्डाच्या मदतीनं तिकीट बुक केल्यानंतर ग्राहकांना सवलत मिळेल. ही ऑफर फक्त 30 जूनपर्यंत तिकीट बुक केलं तर मिळू शकते. 8 हजारापर्यंत सूट या ऑफरमध्ये डोमॅस्टिक फ्लाइटवर प्रवाशांना जास्तीत जास्त 1200 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट तिकिटावर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर जास्तीत जास्त डिस्काउंट 8 हजार रुपये मिळेल. ही सवलत मिळण्यासाठी डोमेस्टिक फ्लाइट बुकिंग कमीत कमी 4 हजार रुपये हवं आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंग कमीत कमी 25 हजार रुपये हवं. भारतीय नौदलात 2700 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज कधीपर्यंत आहे ऑफर आणि कसा घ्यायचा लाभ? तुम्हाला 30 जूनपर्यंत तिकीट बुक करायला हवं. SBI डेबिट कार्डाशिवाय तुम्ही पेमेंट केलंत तर डिस्काउंट मिळणार नाही. या ऑफरसाठी ‘SBI19’ हा प्रोमो कोड वापरा. शिवाय तुम्ही यात्राची वेबसाइट Yatra.com आणि यात्राच्या अॅपवर तिकीट बुक केलंत तरच डिस्काउंट मिळेल. तुम्ही एका कार्डावर एकच तिकीट बुक करू शकता. बुकिंग कम्फर्ड असावं. LIC परीक्षेचं अॅडमिट कार्ड आज मिळणार,‘असं’ करा डाउनलोड
It's take off time! Book flight tickets at the Yatra Monsoon Sale with your SBI Debit Card & avail of these exciting deals. Hurry! Offer valid between 26th June & 30th June, 2019. #SBI #StateBankOfIndia #SBIDebitCard #DebitCard #Yatra #YatraMonsoonSale #Deals #Offers #Discounts pic.twitter.com/2s3Ij0O8Hp
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 28, 2019
कमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा ‘हा’ व्यवसाय नियम आणि अटी बुकिंग रद्द केलंत तर डिस्काउंट मिळणार नाही या ऑफरसोबत तुम्ही दुसरी ऑफर वापरू शकणार नाहीत ही ऑफर वेगवेगळ्या बुकिंगवर नाही SBI आणि यात्रा केव्हाही ही ऑफर रद्द करू शकतात. VIDEO: भोसरीमध्ये गॅस गळतीमुळे इमारतीत अग्नितांडव!