मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook चं नाव बदलणार? जाणून घ्या इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे काय आहे कारण

Facebook चं नाव बदलणार? जाणून घ्या इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे काय आहे कारण

द वर्जने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचं नाव बदलण्याची योजना आखत आहेत.

द वर्जने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचं नाव बदलण्याची योजना आखत आहेत.

द वर्जने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचं नाव बदलण्याची योजना आखत आहेत.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : Facebook Inc कंपनी एका नावासोबत रिब्रँड करण्याची शक्यता आहे. द वर्जने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचं नाव बदलण्याची योजना आखत आहेत. नाव बदलण्याबाबत CEO मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक सभेत माहिती देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीला हा निर्णय घ्यायचा आहे, जेणेकरुन त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्महून अधिकची ओळख मिळावी. रिब्रँडिंगच्या उद्देशाने नावात बदल करण्याचा विचार होत आहे. मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादनं तयार करुन युजर्सला आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा बदल होण्याची शक्यता आहे.

Facebook वर तुमचं फेक अकाउंट आढळलं? असं करा डिलीट

फेसबुकचे फाउंडर Zuckerberg यांनी जुलैमध्ये Earning कॉलमध्ये कंपनीचं भविष्य 'Metaverse' मध्ये असल्याचं सांगितलं होतं. फेसबुक जे लक्ष्य करत आहे, ती एक अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे, जी एका संस्थेअंतर्गत Instagram, WhatsApp आणि Messenger सारख्या अनेक सोशल मीडिया नेटवर्किंग Apps पैकी एक आहेत.

तुमचं Facebook Account वापरात नसेल तर तुमच्या डेटाचं काय होईल? वाचा डिटेल्स

दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी फेसबुकने सांगितलं, की पुढील पाच वर्षांत कंपनी युरोपीय यूनियनमध्ये 10,000 लोकांना कामावर ठेवण्याची योजना आखत आहेत, जेणेकरुन Metaverse बनवण्यात मदत मिळू शकेल. Metaverse एक नवं ऑनलाइन जग आहे, जिथे अनेक लोक असून शेयर्ड वर्चुअल स्पेसमध्ये ते बातचीत करतात. फेसबुक ने virtual reality (VR) आणि augmented reality (AR) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तसंच आपल्या जवळपास तीन अरब युजर्सला नवे डिव्हाईस आणि Apps च्या माध्यमातून जोडण्याचा हेतू आहे.

First published:
top videos

    Tags: Facebook