• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • HDFC Securities चा 'या' दोन स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, तुमच्याकडे आहेत का तपासा

HDFC Securities चा 'या' दोन स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, तुमच्याकडे आहेत का तपासा

HDFC Securities ने निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या 2 समभागांमध्ये खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यापैकी एक ऑटो स्टॉक आणि एक PSU बँक आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : भारतीय बाजारात (Share Market) सध्या तेजी सुरु आहे. गेल्या एक वर्षापासून म्हणजे दिवाळीपासून दिवाळीपर्यंत बाजारातून शानदार रिटर्न मिळाले आहेत. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 60,000 चा टप्पा ओलांडून 62,000 चा टप्पा गाठला. दुसरीकडे, निफ्टी देखील प्रथमच 18000 पार करताना दिसतेय. शेअर बाजारातील तेजीच्या काळात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्यासह अनेक तज्ञ PSU बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, HDFC Securities ने निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या 2 समभागांमध्ये खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यापैकी एक ऑटो स्टॉक आणि एक PSU बँक आहे. यावर एक नजर टाकूया. State Bank Of India एचडीएफसी सिक्युरिटीजने एसबीआयमध्ये 572 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की येथून या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांपर्यंत सहज वर जाऊ शकतो. सध्या हा स्टॉक 530.45 रुपयांवर (SBI Share Price) ट्रेड करत आहे. Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई SBI ने नुकतेच दुसऱ्या तिमाहीचे निकाल (SBI Q2 Result) सादर केले. बँकेचे निकाल खूप चांगले आले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्याच्या 4,574 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 67 टक्क्यांनी वाढून 7,626.6 कोटी रुपये झाला आहे. बँकेचे व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 10.6 टक्क्यांनी वाढून दुसऱ्या तिमाहीत 31,183.9 कोटी रुपये झाले जे मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 28181.5 कोटी रुपये होते. Credit Card चोरीला गेलंय? भुर्दंड टाळण्यासाठी पटकन उचला ही पावलं Tata Motors एचडीएफसी सिक्युरिटीने टाटा मोटर्सवर 560 रुपयांच्या टार्गेटसह (Tata Motors Share Target Price) खरेदीचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीला असा विश्वास आहे की या स्टॉकमध्ये सध्याच्या पातळीवरून 14 टक्क्यांपर्यंत अपसाईड दिसत आहे. सध्या हा शेअर 490 रुपयांच्या आसपास दिसत आहे. चिपच्या तुटवड्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत 45 अब्ज रुपयांचा तोटा झाला आहे. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल आणि उत्पादन वाढेल अशी कंपनीच्या व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. पुढे, कंपनीला नवीन लॉन्चचा फायदा होईल, याशिवाय, कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केल्याचा फायदा होईल. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: