मुंबई, 7 नोव्हेंबर: क्रेडीट कार्ड चोरीला (how to block credit card if stolen) गेलं किंवा हरवलं तर त्याचा बसणारा संभाव्य भुर्दंड टाळण्यासाठी काही पावलं तातडीनं उचलणं गरजेचं असतं. आजकाल अनेकजण (Growing use of credit card) क्रेडीट कार्ड वापरतात. क्रेडीट कार्डवर बँका आकर्षक ऑफर देतात आणि त्याच्या वापरामुळे अनेकदा आकर्षक रिवॉर्ड्सदेखील मिळत असतात. शिवाय एखादी खरेदी करायची असेल तर पैशांसाठी थांबून राहण्याची गरज लागत नाही.
क्रेडीट कार्डची चोरी पडते महागात
क्रेडीट कार्ड हे वापरण्यासाठी सोयीचं असलं तरी त्याची चोरी अनेकदा महागात पडू शकते. डेबिट कार्डपेक्षाही क्रेडिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक मानली जाते. डेबिट कार्डवर जितका बँक बॅलन्स असेल तितकाच भुर्दंड बसतो, मात्र क्रेडीट कार्डवर बसणारा भुर्दंड हा त्याच्या Transaction Limit एवढा असू शकतो. त्यामुळे क्रेडीट कार्डचा चोरट्यांकडून कसा वापर होईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे क्रेडीट कार्डची चोरी झाली तर तातडीनं काही पावलं उचलण गरजेचं आहे.
पिन असूनही आहे धोका
हल्ली अनेक ठिकाणी कॉन्टॅक्टलेस पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप न करता केवळ टॅप करून पैसे भरता येतात. चोरट्यांना तुमच्या क्रेडीट कार्डची पिन माहित नसली, तरी या यंत्रणेचा वापर करून क्रेडीट कार्डवरील पैसे लुबाडले जाण्याची शक्यता असते. त्यासाठी काही पावलं तातडीनं उचलण्याचा सल्ला दिला जातो.
बँकेत करा संपर्क
तुमचं क्रेडिट कार्ड हरवलं असेल तर तुम्ही त्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊ शकता आणि तुमचं कार्ड ब्लॉक करण्याची विनंती त्यांना करू शकता.
कॉल सेंटरला फोन करणे
तुम्ही कॉल सेंटरला फोन करूनही तुमचं कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करू शकता. कार्ड ब्लॉक केल्यानंतर काही क्षणांतच त्यावरील व्यवहार बंद केले जातात आणि चोरट्यांना तुमचं कार्ड वापरून कुठलाही व्यवहार करता येत नाही.
हे वाचा- Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई
नेट बँकिंग
तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल, तर तुमच्या खात्यावर लॉग-इन करून तुमचं कार्ड ब्लॉक करण्याचा पर्याय निवडू शकता. किंवा मोबाईल ऍपवरूनदेखील कार्ड ब्लॉक करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Personal banking