मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

TTI Enterprise च्या स्टॉकने गेल्या एका वर्षात त्यांच्या भागधारकांना 3,785 टक्के परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक 18 डिसेंबर 2020 रोजी 1.05 रुपयांवर बंद झाला, जो 20 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 40.80 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : सध्या स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळेत श्रीमंत केले आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. पेनी स्टॉक (What is penny Stock?) हे असे स्टॉक आहेत जे खूप स्वस्त आहेत आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी आहे. TTI Enterprise हा स्टॉक देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वर गेला आहे. मागील वर्षभरात हा

1 रुपयांचा स्टॉक 41 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. TTI Enterprise च्या स्टॉकने गेल्या एका वर्षात त्यांच्या भागधारकांना 3,785 टक्के परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक 18 डिसेंबर 2020 रोजी 1.05 रुपयांवर बंद झाला, जो 20 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 40.80 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

MapmyIndia च्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, 1033 रुपये इश्यू प्राइस 1565 रुपये लिस्टिंग प्राईज

वर्षभरात एक लाखाचे 39 लाख रुपये

TTI Enterprise च्या शेअर्समधील वर्षभरापूर्वीच एक लाख रुपयांची गुंतवणूक 38.85 लाख रुपये झाली आहे. काल बीएसईवर शेअर 0.99 टक्क्यांनी वाढून 40.80 रुपयांवर ट्रेड करत होता. यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी स्टॉकने 52.05 रुपयांचा 52 आठवड्यांचा हाय गाठला होता. मात्र, तेव्हापासून त्यात प्रॉफिट-बुकिंग दिसून येत आहे.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

कंपनीचे मार्केट कॅप वाढून 99.20 कोटी रुपये झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून TTI एंटरप्राइझचा स्टॉक 2,967 टक्क्यांनी वधारला आहे आणि एका महिन्यात 6.81 टक्क्यांनी वाढला आहे. TTI Enterprise ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. कंपनी शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन वित्तपुरवठा करते.

First published:

Tags: Investment, Money, Share market