मराठी बातम्या /बातम्या /मनी /

MapmyIndia च्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, 1033 रुपये इश्यू प्राइस 1565 रुपये लिस्टिंग प्राईज

MapmyIndia च्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, 1033 रुपये इश्यू प्राइस 1565 रुपये लिस्टिंग प्राईज

Mmapmyindia या IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. हा IPO 13 डिसेंबरला बंद झाला. तो 154.71 वेळा सबस्क्राईब झाला. आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल होता.

Mmapmyindia या IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. हा IPO 13 डिसेंबरला बंद झाला. तो 154.71 वेळा सबस्क्राईब झाला. आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल होता.

Mmapmyindia या IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. हा IPO 13 डिसेंबरला बंद झाला. तो 154.71 वेळा सबस्क्राईब झाला. आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : MapmyIndiaची आज शेअर बाजारात लिस्टिंग झाली आहे. या लिस्टिंगनंतर गुंतवणूकदार आनंदी झाले आहेत. या IPO मधून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळाला आहे. CE इन्फो सिस्टीमचा ब्रँड, MapmyIndia चे शेअर्स इश्यू किमतीच्या 53 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. या IPO ची इश्यू किंमत 1033 रुपये प्रति शेअर होती आणि त्याचे शेअर्स NSE वर 1565 रुपयांवर लिस्ट झाले आहेत.

या IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. हा IPO 13 डिसेंबरला बंद झाला. तो 154.71 वेळा सबस्क्राईब झाला. आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल होता.

संपूर्ण IPO ऑफर फॉर सेल

ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे प्रमोटर आणि शेअर होल्डर्स त्यांचे स्टेक विकत आहेत. याचा अर्थ असा की IPO मधून जमा होणारा पैसा कंपनीकडे जाणार नाही तर हिस्सा विकणाऱ्या शेअर होल्डर्सकडे जाणार आहे. यामध्ये रश्मी वर्मा, Qualcomm Asia Pacific आणि Zenin यांचा शेअर होल्डर म्हणून समावेश आहे.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

IPO च्या बाबतीत या वर्षी अनेक विक्रम होणार आहेत. मग तो निधी उभारण्याचा विषय असो किंवा शेअर्सच्या वर्गणीचा विषय असो. काल सोमवारी देखील, बंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचे शेअर्स लिस्ट झाले. मात्र, या आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक तोट्यात लिस्ट झाले.

या आठवड्यातील लिस्टिंग होणार शेअर

या आठवड्यात अनेक IPO लिस्ट होणार आहेत. उद्या, बुधवार 22 डिसेंबर रोजी, Metro Brand चा IPO लिस्ट होईल. आयपीओ 10 ते 14 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तो 3.64 वेळा सबस्क्राईब झाला आहे.

फार्मसी रिटेल चेन Medplus Health Servises लिमिटेडचा IPO, भारतातील दुसरा सर्वात मोठा फार्मसी रिटेलर, 23 डिसेंबर रोजी लिस्ट होईल. तसेच संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा पुरवठा करणारी कंपनी Data Pattern (India) लि. चा IPO 24 डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट होईल.

तुमच्याकडे असलेले PAN Card बनावट तर नाही? दोन मिनिटात असं करा चेक

Fabindia देखील IPO आणणार

IPO यादीत फॅब इंडियाचेही नाव जोडले जाणार आहे. या IPO च्या माध्यमातून सुमारे 4000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. फॅबइंडियाने आपल्या स्टोअर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी नवीन भांडवलात 250 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. असे सांगितले जात आहे की 60 वर्षे जुन्या कंपनीचे अनेक गुंतवणूकदार त्यांचे स्टेक देखील विकतील, ज्यामुळे IPO चे एकूण आकार 3,800-4,000 कोटी रुपये होईल.

First published:

Tags: Investment, Money, Share market