जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Train Insurance: रेल्वे देते फक्त 35 पैशांच इन्शुरन्स! पाहा अपघात झाल्यास किती लाख मिळतात?

Train Insurance: रेल्वे देते फक्त 35 पैशांच इन्शुरन्स! पाहा अपघात झाल्यास किती लाख मिळतात?

ट्रेन इन्शुरन्स

ट्रेन इन्शुरन्स

Train Insurance: रेल्वे तिकीट बुक करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रवाशाच्या मृत्यूनंतर 10 लाख रुपयांची भरपाई मिळते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Train Insurance: ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी एक भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 280 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या जीवाला नक्कीच किंमत नाही, पण तुम्हाला माहित आहे का की रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताना भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन म्हणजेच IRCT प्रवाशांना विमा देखील प्रदान करते. या अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण देण्याची तरतूद आहे. हा विमा कसा मिळवायचा हे आज आपण पाहणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

तिकिट बुक करताना दिला जातो ऑप्शन

देशात आपण जेव्हा लांबच्या प्रवासाचा विचार करतो तेव्हा लोक सामान्यतः ट्रेनचा प्रवास अधिक चांगला मानतात. रेल्वेने प्रवास करण्याचेही अनेक फायदे आहेत. डिजिटायझेशनच्या युगात तिकीट काउंटरवर वेळ न घालवता घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुक करता येतात. यामध्ये तुमची सीट निवडण्यापासून ते प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याचा ऑप्शन दिला जातो. यासोबतच तिकीट बुक करताना, तुम्हाला इन्शुरन्स घेण्याचा पर्याय देखील दिला जातो. ज्याद्वारे प्रवासादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या नुकसानीसह जीवित आणि मालमत्तेचे नुकसान देखील कव्हर केले जाते.

सर्वात स्वस्त इन्शुरन्स कव्हर

IRCTC केवळ 35 पैशांच्या जवळपास शून्य प्रीमियमवर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते. हा पर्याय ऑप्शनल असला तरी प्रवाशांसाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम विमा संरक्षण असू शकतो. तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट IRCTC वेबसाइटवरून बुक करता तेव्हा तुम्हाला पेमेंट प्रोसेसदरम्यान प्रवास विम्याचा ऑप्शन मिळतो. तुम्ही ते निवडल्यास, तुम्हाला हे विमा संरक्षण 35 पैशांमध्ये मिळते. विशेष बाब म्हणजे हे सर्व प्रवाशांना लागू होते ज्यांचे तिकीट एका PNR द्वारे बुक केले आहे.

Railway News: जगातील सर्वात मोठी पॅसेंजर ट्रेन, डब्बे मोजता मोजता फुटेल घाम!

या परिस्थितीत मिळतं विमा संरक्षण

आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार केवळ 35 पैसे खर्च करून हा विमा काढता येईल. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विमा संरक्षणामध्ये स्थायी आंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, दुखापत किंवा गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहतूक खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यू यांचा समावेश होतो. यासोबतच, ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.

Railway News: या आहेत भारतातील सर्वात जुन्या ट्रेन, आजही धावताय रुळांवर; तुम्हीही यातून प्रवास केलाय का?

दुखापतीसाठी 2 लाख मृत्यूसाठी 10 लाख

आयआरसीटीसीने दिलेल्या या विमा संरक्षणासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष केंद्रीत केल्यास, प्रवासादरम्यान अपघात झाल्यास आणि प्रवासी जखमी झाल्यास, दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास, त्याला 2 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपयांचे संरक्षण देण्याची तरतूद आहे. दरम्यान, अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थिवाच्या वाहतुकीसाठी 10,000 रुपये आणि मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात