मुंबई, 25 जून : ट्राय लवकरच नव्या केबल टीव्ही टॅरिफ सिस्टममधल्या कमतरता दूर करणार आहे. त्यासाठी त्यात बदल करणार आहे. ट्रायच्या म्हणण्याप्रमाणे नव्या व्यवस्थेत बदलाचा नवा दौर सुरू झालाय. पारदर्शकताही वाढलीय. ग्राहक आता आपल्या पसंतीनं कुठलाही आॅपरेटर निवडू शकतात. नुकत्याच एका मुलाखतीत ट्रायच्या प्रमुखानं सांगितलं की जेव्हा नवी गोष्ट सुरू होते तेव्हा काही क्षेत्रांमध्ये आशा निर्माण होऊन कामं होतात. काही क्षेत्रांत सुधारणा होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रायनं किमतीत बदल केले होते. ते म्हणाले, ‘आम्ही पाहतोय की टॅरिफ सिस्टिम लागू करण्यात कुठे कमतरता आलेली नाही ना, म्हणजे त्यात बदल करता येईल. त्यासाठी आम्ही डेटा गोळा करतोय. त्यानुसारच पुढच्या गोष्टी होतील.’ खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आदेशानुसार प्रेक्षक दर महिन्याला 153 रुपये ( जीएसटी धरून ) खर्च करून 100 चॅनेल्स पाहू शकतात. 1 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू झाले होते. IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज जर तुम्हाला 100हून जास्त चॅनेल पाहायचे असतील ( असे ग्राहक 10 ते 15 टक्के आहेत ) तर पुढच्या 25 चॅनेल्सना 20 रुपये द्यावे लागतील. एका चॅनेल्ससाठी कमीत कमी शून्य ते जास्तीत जास्त 19 रुपये खर्च करावे लागतील. इतर चॅनेल्स वेगवेगळ्या बुकेच्या रूपात तुम्हाला निवडता येतात. ‘भारताचा हा हुकुमी एक्का चालला की वर्ल्ड कप थेट विराटच्या हातात’ ट्राय हा प्रयत्न करतंय की नव्या नियमांबरोबर टीव्ही सेट टाॅप बाॅक्सलाही मोबाइलसारखं सिम कार्ड असेल. दर वेळी डीटीएच कंपनीचा वेगळा सेट टाॅप बाॅक्स असतो. तो बदलण्याचा खर्च करावा लागतो. अनेकदा तो खर्च जास्त असतो. TRAI याच नियमात बदल करू पाहतंय. ही सिम कार्डाची पद्धत कधी सुरू होईल, हे अजून नक्की ठरलं नाहीय. पण या वर्षाच्या शेवटपर्यंत हा बदल होईल, अशी आशा आहे. VIDEO : ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







