लंडन, 25 जून : ICC Cricket World Cup 2019मध्ये भारत सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. विराटसेनेला सेमीफायनलचे तिकीट मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, 9 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकालर आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवले आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खेळणाऱ्या भारतीय संघानं 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळला होता. भारतानं इतर संघाच्या तुलनेत आतापर्यंत कमी सामने खेळले आहेत. त्यामुळे आता येत्या 10 दिवसांत भारतीय संघ 4 मुख्य सामने खेळणार आहे. याता आता गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघ भिडेल. त्यामुळं येत्या 10 दिवसांत भारताचं विश्वचषकातलं भविष्य ठरणार आहे मात्र, भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकवण्यासाठी विराट कोहली किंवा रोहित शर्मा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार नाही आहे. तर, भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप जिंकून देणार आहे. दरम्यान असा दावा केला आहे 2015च्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजयी संघाचा कर्णधार मायकल क्लार्क यानं. क्लार्कनं एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘‘भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास त्याची चावी जसप्रीत बुमराहकडे असेल. बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल. बुमराहकडे कौशल्य आहे. तो तंदुरुस्त आहे.’’, असे सांगितले. का आहे बुमराह खतरनाक क्लार्कनं, “बुमराहकडे सर्व टॅलेंट आहे. त्यामुळं भारताच्या विजयासाठी तो प्रमुख दुवा आहे”, असे सांगितले. तर, बुमराह सर्वात खतरनाक बॉलर का आहे, या प्रश्नावर त्यानं, “नव्या चेंडूनं तो स्विंग आणि सीम दोन्ही करतो. तसेच, तो फलंदाजांवर दबावही टाकू शकतो. 150च्या गतीनं तो गोलंदाजी करतो. यॉर्कर हे त्याचे प्रमुख अस्त्र आहे”. त्यामुळं बुमराह सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. प्रत्येक कर्णधाराला आपल्या संघात हवा बुमराह एवढेच नाही तर क्लार्कनं, “प्रत्येक कर्णधाराला आपल्या संघात बुमराह हवा, असे वाटत असते. तो ओव्हरची सुरुवात करू शकतो, तो 35व्या ओव्हरमध्येही गोलंदाजी करू शकतो. त्यामुळं प्रत्येक संघात तो हवाच”, असे सांगितले. तसेच त्यानं कोहलीच्या कर्णधारपदाचेही कौतुक केले. वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका वाचा- World Cup: ‘भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली’ वाचा- अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, ‘हे’ आहे कारण बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







