मराठी बातम्या /बातम्या /मनी /Covid 19 Vaccination: कामगार संघटनांची मोफत लसीकरणाची मागणी, 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा

Covid 19 Vaccination: कामगार संघटनांची मोफत लसीकरणाची मागणी, 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा

व्हॅक्सीन म्हणजे काय ?  जाणून घ्या कसं काम करतं ?

व्हॅक्सीन म्हणजे काय ? जाणून घ्या कसं काम करतं ?

1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय ट्रेड यूनियन्सच्या (Trade Unions) एका संयुक्त मंचाने सर्वांना मोफत लसीकरण (Vaccination Free of Cost) करावं अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली, 29 एप्रिल: देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेचा (Corona Vaccination Drive in India) पुढील टप्पा सुरू होणार आहे. 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय ट्रेड यूनियन्सच्या (Trade Unions) एका संयुक्त मंचाने सर्वांना मोफत लसीकरण (Vaccination Free of Cost) करावं अशी मागणी केली आहे. यूनियन्सच्या या संघटनेनं 1 मे रोजी प्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे, यामध्ये 10 यूनियन्सचा समावेश आहे.

या संघटनेकडून गरीब परिवारांना दरमहा 7500 रुपये आणि 10 किलोग्राम मोफत धान्य देण्याची देखील मागणी केली आहे. या संघटनेने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 1 मे रोजी कामगार दिनी सरकारच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी आणि जनता-विरोधी धोरणांचा विरोध या प्रदर्शनातून करणार आहेत.

(हे वाचा-30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ही 4 महत्त्वाची आर्थिक कामं, मिळेल चांगला फायदा)

पंतप्रधानांना लिहिलं पत्र

कामगार संघटनांच्या या संयुक्त मंचाने पंतप्रधानांना पत्र लिहून याविषयी मागणी केली आहे. कोव्हिड-19 (COVID-19) चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या बेजबाबदार धोरणांचा त्यांनी यामध्ये निषेध केला आहे. या संयुक्त मंचामध्ये एकूण 10 संघटना सहभागी आहेत. यात नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस (INTUC), ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेस (AITUC), हिंद मजूर सभा (HMS), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (CITU), ऑल इंडिया यूनाइटेड ट्रेड यूनियन सेंटर (AIUTUC), ट्रेड यूनियन को-ऑर्डिनेशन सेंटर (TUCC), सेल्फ-एंप्लॉयड वुमेन्स असोसिएशन (SEWA), ऑल इंडिया सेंट्रल काउंसिल ऑफ ट्रेड यूनियंस (AICCTU), लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF) आणि यूनाइटेड ट्रेड यूनियन काँग्रेस (UTUC) सहभागी होणार आहेत.

(हे वाचा-Reliance Foundation जामनगरमध्ये कोरोनारुग्णांना मोफत देणार 1000 बेड्सची सोय)

कोव्हिडच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता यूनियनने रुग्णालयातील बेड वाढवावेत, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा द्याव्यात अशी मागणी देखील केली. या संघटनांनी असेही म्हटले आहे की सर्व नियोक्त्यांना असे आदेश देण्यात यावेत की त्यांनी कर्मचाऱ्यांना कामवरून कमी करणे, मजुरांना कामवरून काढून टाकणे, वेतन कपात करणे इ. गोष्टी देखील करून नयेत.

सहा महिन्यासाठी धान्य मोफत देण्याची मागणी

या कामगार संघटनांनी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये न येणाऱ्या परिवारांना दरमहा 7500 रुपये देण्यात यावेत अशी देखील मागणी केली आहे. तसंच पुढील सहा महिन्यासाठी प्रति व्यक्ती दरमहा दहा किलो रेशन देण्याचीही त्यांची मागणी आहे. त्यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांसह सर्व आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांना संरक्षक उपकरणे उपवब्ध करून देण्याची आणि या सर्वांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Coronavirus