मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबईनंतर Reliance Foundation ची गुजरातमध्ये मोठी मदत; कोरोनारुग्णांना मोफत देणार 1000 बेड्सची सोय

मुंबईनंतर Reliance Foundation ची गुजरातमध्ये मोठी मदत; कोरोनारुग्णांना मोफत देणार 1000 बेड्सची सोय

 Reliance Foundation च्या वतीने जामनगर इथे कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.

Reliance Foundation च्या वतीने जामनगर इथे कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.

Reliance Foundation च्या वतीने जामनगर इथे कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.

मुंबई, 28 एप्रिल : रिलायन्स फाउंडेशनतर्फे (Reliance Foundation covid care facility in Jamnagar) मुंबईत कोरोनारुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, ICU सुविधांसह वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली. आता गुजरातमध्येही Reliance Foundation च्या वतीने कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.

RF ने मुंबईत कोरोना रुग्णांसाठीची सुविधा (Covid care centre Reliance) 827 बेड्स पर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये कोविड केअर सेंटरच्या सुविधा देण्यात येणार आहेत. जामनरच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये तातडीने 400 बेड्सच्या कोविड केअर सेंटरसाठी सुविधा दिल्या जातील. उपचारांचा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशनतर्फे केला जाईल. सौराष्ट्रातल्या नागरिकांना याचा फायदा होईल.

रिलायन्स फाउंडेशनची कोविड काळात सर्वाधिक मदत; मुंबईत 875 बेड्सची सुविधा

 पुढच्या दोन आठवड्यापर्यंत आणखी 600 बेड्सच्या सुविधा दुसऱ्या जागेवर उभ्या करण्यात येतील. भारताच्या कोविड महासाथी विरुद्धच्या लढ्यात रिलायन्स फाउंडेशन कार्यरत आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत शक्य तेवढी सगळी मदत करायला आम्ही कटिबद्ध आहोत. त्यातूनच 1000 बेड्सची मोफत सुविधा गुजरातमध्ये सुरू करत आहोत, असं रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी (Reliance Foundation Chairperson Neeta Ambani) म्हणाल्या. या ठिकाणच्या वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय स्टाफ या सगळ्याचा खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे समूह अध्यक्ष धनराज नाथवानी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी या साथीत देशवासीयांसाठी अविरत काम करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही राज्यासाठी अनेक कामं केली आहेत. त्यांच्या जोडीने या राज्याच्या आरोग्य सुविधांना या संकटकाळात हातभार लावण्यासाठी रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक (Relaince CMD Mukesh Ambani)मुकेश अंबानी पुढे आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सची टीम कमीत कमी वेळात जामनगरमध्ये दोन ठिकाणी कोविड केअर सुविधा उभी करणार आहे."

वाढत्या कोरोना संकटाचा तडाखा लक्षात घेत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने मुंबईत कोरोना रुग्णांसाठीची सुविधा (Covid care centre Reliance) 827 बेड्स पर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कुठल्याही संस्थेने केलेल्या मदतीत अग्रणी राहिलेल्या रिलायन्स फाउंडेशनने कोविड केअरसाठी मुंबईत सर्वात मोठ्या प्रमाणावर सेवा देऊ केल्या आहेत.

HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) वतीने वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबवर (NSCI Worli Mumbai) केलेली 650 बेड्सच्या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन करण्यात येईल. याशिवाय रिलायन्स फाउंडेशनने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC Trident hotel) इथल्या ट्रायडण्ट हॉटेल इथे लक्षणं नसलेल्या रुणांसाठी 100 बेड्सची आयसोलेशन सुविधा पुरवण्यात आली आहे. 100 ICU बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? काय करायचं?

वरळीच्या नॅशनल स्पोर्ट् स क्लब ऑफ इंडियामध्ये (NSCI)कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येईल. याशिवाय RF अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करणा आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील.

First published:

Tags: Coronavirus, Gujarat, Neeta ambani, Reliance