मराठी बातम्या /बातम्या /मनी /30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ही 4 महत्त्वाची आर्थिक कामं, मिळेल चांगला फायदा

30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ही 4 महत्त्वाची आर्थिक कामं, मिळेल चांगला फायदा

एप्रिल महिना (April 2021)आता संपत आलाआहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही ही चार महत्त्वाची कामं या दोन दिवसात पूर्ण केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होईल.

एप्रिल महिना (April 2021)आता संपत आलाआहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही ही चार महत्त्वाची कामं या दोन दिवसात पूर्ण केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होईल.

एप्रिल महिना (April 2021)आता संपत आलाआहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही ही चार महत्त्वाची कामं या दोन दिवसात पूर्ण केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होईल.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल: एप्रिल महिना (April 2021)आता संपत आलाआहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही ही चार महत्त्वाची कामं या दोन दिवसात पूर्ण केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होईल.

    जमा करा 15G/15H फॉर्म

    ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 15 एच (15 H Form) भरावा लागतो. तर ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना 15 जी (15 G Form) फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरणं आवश्यक आहे कारण लाभांश (Dividend) किंवा कोणतंही व्याज (Interest) मिळाल्यास त्यावर टीडीएस (TDS-Tax at Source) कापला जाऊ नये यासाठी हे फॉर्म भरणं आवश्यक असतं. अर्थात यासाठी काही निकष असून ते पूर्ण करणं आवश्यक आहे. तुमची व्याजाची रक्कम वर्षाकाठी 2.5 लाखांपेक्षा जास्त नसेल आणि एकूण उत्पन्नावरील कराची रक्कम शून्य असेल तरच तुम्हाला 15 जी फॉर्म भरावा लागेल. कोणत्याही आर्थिक वर्षात आपला एकूण अंदाजित कर शून्य असल्यास 15 एच फॉर्म भरावा लागेल. आता हे अर्ज ऑनलाइन जमा करण्यास बँकांनी मान्यता दिली आहे.

    सुरू करा कर नियोजन

    कर नियोजन (Tax Planning) वेळेत सुरू करणं आवश्यक असून, त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक केली पाहिजे. वर्षाच्या शेवटी करण्याची कामं म्हणून याकडे पाहणे योग्य नाही. बहुतांश वेळा कर वाचवण्यासाठी लोक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत गुंतवणूक करतात.अशावेळी खूप धावपळ करावी लागते तसंच घाई-गडबडीत फार विचार न करता गुंतवणूक केली जाते. त्यामुळं शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा आधीपासूनच नियोजन करणं चांगलं आहे.

    (हे वाचा-दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत)

    पीपीएफमध्ये गुंतवणूक करा

    तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूकीचा विचार करत असाल, तर पीपीएफ आपल्याला नक्कीच अधिक चांगला परतावा देऊ शकेल.तुमचं पीपीएफ खातं नसल्यास नवीन पीपीएफ खातं उघडा. यातील गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1 टक्के दरानं व्याज मिळेल आणि ते करमुक्त आहे. आता गुंतवणूक केली तर त्यावर सध्याचा व्याज दर मिळेल.

    आवश्यक असल्यास पीएफमधील योगदान बदला :

    एप्रिल 2021 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ (EPF-Employee Provident Fund) संबंधित नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2021 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवरील व्याज करपात्र (Taxable) केलं आहे. म्हणजेच ईपीएफमध्ये वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाणार आहे. त्यामुळं ईपीएफ किंवा व्हीपीएफ मध्ये वार्षिकअडीच लाखाहून अधिक रुपयांचे योगदान देत आहेत त्यांनी या नवीन आर्थिक वर्षासाठी याबाबत विचार करावा.

    First published:

    Tags: Money, Open ppf account, PPF, Tax, Tax benifits