जून 2022 मध्ये, भारतातील प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे एकूण उत्पादन, 2,081,148 वाहनांचे होते. भारतीय वाहननिर्मिती उद्योगक्षेत्र 2016-26 दरम्यान वाहनांची निर्यात पाच पटीने वाढवण्याचे लक्ष्य ठेवून आहे, आर्थिक वर्ष 22 मध्ये भारताच्या एकूण वाहननिर्यातीचा हा आकडा 5,617,246 होता. भारत सरकार वाहननिर्मिती क्षेत्राकडून 2023 पर्यंत स्थानिक आणि विदेशी गुंतवणुकीतील मिळून 8 ते 10 बिलियन अमेरिकन डॉलर्स आणून देण्याची अपेक्षा बाळगून आहे. नीती आयोग आणि रॉकी माउंटन इंस्टिट्युटच्या मते, भारतातील EV वित्तसहाय्य उद्योगाचा विस्तार 2030 पर्यंत रू. 3.7 लाख अब्जापर्यंत (US$ 50 बिलियन) जाण्याची शक्यता आहे आणि त्याच वर्षी भारत शेअर्ड मोबिलिटी क्षेत्राचे नेतृत्वही करत असेल, ज्यातून इलेक्ट्रिक आणि स्वायत्ततेने वाहनक्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देत असेल. मध्यमवर्गीय भारतीयांमध्ये एकेकाळी विलासी आयुष्याचे साधन म्हणून चारचाकी वाहनांकडे (दुचाकी देखील) पाहिले जात होते, हे लक्षात घेता ही आकडेवारी कौतुकास्पद ठरते. ही अगदी 40 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. 1991 पर्यंत भारतीय उद्योगांना खूपच प्रतिबंधित असलेल्या अशा लायसंस राजमध्ये राहून काम करावे लागत असे: एक असा काळ ज्यामध्ये परवाने, नियम आणि लालफितीचा कारभार चालत असे ज्यामुळे 1947 आणि 1990 मध्ये भारतात उद्योग सुरू करून तो चालवण्यात अडचणी येत असत. लायसंस राज हे अशा लोकांच्या डोक्यातून आलेली संकल्पना होती जे समाजवादाच्या माध्यमातून भारतातील गरीब शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा विचार करत होते. स्वातंत्र्यानंतर हे विचार घेऊन चालणारे लोक जसे सत्तेमध्ये आले तसा समाजवादाने आपला मोर्चा लायसंस राजच्या धोरणांमध्ये आणला. दुर्दैवाने, प्रत्यक्षात लायसंस राजपद्धतीने आर्थिक वृद्धी आणि गरीबाची प्रगती खुंटली जे की उलट घडणे अपेक्षित होते. भारतीय उद्योगांसाठी, अगदी यशस्वी असतील त्यांच्याही प्रगतीच्या वाटेमध्ये अडथळेच निर्माण होऊ लागले. वाचा - NPS खातेधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि नॉमिनी नसेल तर पैसे कसे मिळवायचे? त्यातूनही काही कंपन्यांनी अडथळ्यांना मागे टाकून प्रसिद्धी कमावली. याच त्या कंपन्या होत्या ज्यांचे उत्पादन इतक्या उच्च गुणवत्तेचे आणि भरपूर मागणी असलेले होते की ग्राहकांनी आपल्यासाठी ती खरेदी करण्यासाठी 10 वर्षे प्रतिक्षा केली. भारतीय वाहननिर्मिती उद्योगक्षेत्रात असाच एक बलाढ्य खेळाडू निर्माण होत होता. 1970-90 मध्ये भारतामध्ये प्रवास करणे सोपे नव्हते. अगदी राजधानीत देखील बस सेवा वेळेवर नव्हती, आणि एखाद्या डब्यातून प्रवास करत असल्यासारखे वाटत असे. टॅक्सी आणि रिक्षावाले हे आपलेच राज्य असल्यासारखे वागत (अजूनही वागतात!) आणि बहुतेक भारतीय शहरातील आकारले जाणारे शुल्क हे अधिकृत भाडेसूचीपेक्षा फार वेगळे असे. त्याचप्रमाणे हे खर्चिक असे. तसेच अविश्वसनीय होते. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी त्यावेळी सर्वात मोठे स्वप्न होते ते म्हणजे स्वत:ची स्कूटर खरेदी करणे- म्हणजेच बजाज चेतक घेणे. आज 40 च्या वयोगटात असलेला एक मोठी पिढी आहे ज्यांना शाळेत जाताना त्यांच्या वडिलांच्या चेतक स्कूटरच्या पुढल्या बाजूला उभे राहून जाण्याच्या स्मृती आहेत. 1972 मध्ये लॉंच झालेली, अशा बाजारपेठेमध्ये जिथे केवळ इंपोर्टेड वेस्पा आणि लॅंब्रेटालाच (जी भारतामध्ये बजाजनेच आणली) ओळखले जात असे, ज्यातून बजाज चेतकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ती वेस्पा स्प्रिंटसारखी तयार केली आली होती. मात्र, त्याचे नाव मात्र महाराणा प्रतापांच्या विश्वसनीय वाहन असलेल्या चेतकवरून ठेवले होते. स्कूटर म्हणजे नवीन काहीच नव्हते पण ही स्कूटर म्हणजे एक क्रांती हे समीकरण होते. पुरवठ्याच्या मानाने मागणी खूपच अधिक झाली होती. मात्र तो काळ लायसंस राजचा असल्यामुळे बजाजला मागणीला साजेशी उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मुक्त नव्हते. याचा अर्थ किंमती दुप्पट झाल्या आणि लवकरच बजाज चेतक मिळवण्यासाठी लागणारा कालावधी 10 वर्षांइतका मोठा झाला. मग लोक वाट पाहत राहिले कारण त्यांना ठाऊक होते की चेतक त्या तोडीची होती. ती परवडण्यासारखी होती. ती मजबूत होती. किक मारल्याबरोबर ती चालू होत असे. ती कुणीही दुरूस्त करू शकणार होते. आणि तीचा मायलेजही कौतुकास्पद होता. थोडक्यात सांगायचे तर, ते प्रामाणिकतेसाठी ओळखल्या जाणार्या कंपनीचे एक उच्च गुणवत्तेचे उत्पादन होते. वाचा - रॉकेटसारखे सुसाट वेगानं वाढतायत दर, पाहा 10 दिवसांत कितीने वाढलं सोनं बजाज ऑटोसाठी हे सर्वात मोठे यश ठरत असताना त्यांच्यामुळे गाजावाजा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. भारतातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या क्रांतीसाठी बजाज ऑटो संपूर्णपणे जबाबदार होती. 1948 मध्ये, त्यांनी इंपोर्टेड वाहने विकण्यापासून सुरूवात केली आणि 1959 पर्यंत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता बनवली. 1960 मध्ये त्यांचे यश द्विगुणित झाले जेव्हा ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली, आणि एका दशकानंतर 1970 मध्ये त्यांनी त्यांचे 1,00,000 वे वाहन तयार झाले. 1977 मध्ये मागील बाजूस इंजिन असलेली ऑटोरिक्षा हे गच्च भरलेल्या बसना आरामदायी पर्याय निर्माण झाला, आणि अचानक महिलांसाठी कॉलेज, कामावर किंवा मुलांना स्वत: शाळेत घेऊन जाण्याचा एक सुरक्षित पर्याय निर्माण झाला. त्यानंतर 1991 मध्ये उदारीकरण आले. बजाजने आपल्या उच्च गुणवत्तेच्या, टिकाऊपणा, विश्वसनीय वाहनांच्या जोरावर परवडणार्या किंमतींच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपले स्थान सिद्ध केले. आज बजाज ऑटोचे भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रातील निर्यातीमधील आघाडीवरील स्थान अबाधित आहे, ज्यामध्ये 11,845 कोटींच्या उलाढालीसह देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्यातीची संख्या आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, बजाज ऑटोचे 47 टक्के उत्पादन हे 79 देशांमध्ये निर्यात करण्यात आले. बर्याच बाबतीत बजाज ऑटोची कथा ही भारत आयएनसी. ची वृद्धीगाथा देखील आहे. दोन्हींच्या बाबतीत आलेल्या अडथळ्यांना ओलांडण्यापासून सुरूवात झाली आणि प्रत्येक लहानशा यशासाठी प्रदीर्घ काळ आणि कठोर परिश्रम करावे लागले, दोन्हींच्या बाबतीत क्षमता वाढवणे आणि स्वत:ला बदलत्या काळानुसार पावले उचलावी लागली आणि त्यामुळे दोन्हीही कणखरपणे उभेच राहिले आहेत. बजाज ऑटो ही देशातील लायसंस राज संपुष्टात आल्यानंतरही टिकून राहिलेल्या स्थानिक कंपन्यांपैकी एक आहे. यातले थोडेसे कारण म्हणजे स्वत:ला पुन्हा नव्याने सादर करत राहणे आणि मोठमोठ्या झेपी घेण्यासाठी त्यांची तयारी असते. मात्र बजाजची महत्त्वाची देणगी म्हणजे गुणवत्ता: गुणवत्तापूर्ण उत्पादन, गुणवत्तापूर्ण सेवा आणि नि:शंकपणे आजमावता येणारी प्रामाणिकपणे उद्योग करण्याची क्षमता. हा मजबूत पाया उभारत असताना बजाज ऑटोला 90 च्या दशकाच्या शेवटाला असलेली आर्थिक भौगोलिक स्थिती जेव्हा ऐतिहासिक उदारीकरणाच्या प्रयत्नानंतर भारताला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्यासाठी काटेकोरपणा आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय स्तराची गुणवत्तेची मानकत्वांनी युक्त असलेली यंत्रणे आवश्यक होती. 1996 मध्ये, क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया (QCI) स्थापन झाले आणि भारत सरकारने ASSOCHAM, FICCI व CII च्या सहसंयोगाने QCI ला एका आस्थपानेचे रूप देण्यासाठी काम केले. भारतीय कंपन्याना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून स्पर्धेचा सामना करावा लागत असल्यामुळे तो भारतीय कंपन्यांसाठी काही चांगला काळ ठरत नव्हता. स्थानिक कंपन्यांना गुणवत्ता आणि सक्षमतेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबद्दल शिकून घेणे आणि त्यांच्याशी एकरूप होणे आवश्यक होते आणि त्याचबरोबर स्पर्धेत टिकून राहण्यायोग्य ठरणेही महत्त्वाचे होते. किंमतीचा विचार करणाऱ्या भारतीय ग्राहकाला अचानक भरपूर पर्याय निर्माण झाले आणि तो मात्र त्याच्या खिशाला साजेल त्यानुसार निवड करत होता. या संपूर्ण काळामध्ये ज्या भारतीय कंपन्या टिकून राहिल्या त्यांनी केवळ ग्राहकांच्या झटपट बदलणार्या आवडींनुसार बदलण्याची क्षमता दाखवली असे नाही तर त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीतही सर्वोत्तम स्थान पटकावले..
मागील 25 वर्षे आपला माल गुणवत्तेच्या मानकांचे पालन करत असल्याची खात्री करून आणि विविध क्षेत्रांमधील उत्पादनांना प्रमाणित करून भारतामध्ये गुणवत्तेच्या चळवळीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याची मोर्चेबांधणी करून आणि त्यांना आवश्यक असलेल्या संसाधनांची पूर्तता करून QCI ने भारतीय कंपन्या गुणवत्तेकडे, प्रामाणिकपणाकडे आणि ग्राहककेंद्री दृष्टीकोनाला महत्व देण्याचा पायंडा घालून देण्यात मदत केली आहे. भारताची गुणवत्तेतून आत्मनिर्भरता ही चळवळ भारतीय उद्योगांना गुणवत्तेबाबतचा आजवरचा सर्वोच्च दर्जा, सुधारित स्पर्धात्मकता आणि आजवरचा सर्वोच्च ग्राहक विश्वास मिळवून देण्यासाठी आव्हान देत त्यांना जागतिक बाजारपेठेमध्ये यशस्वी होण्यासाठी सज्ज करत आहे. भारतातील उत्पादनक्षेत्रामध्ये होत असलेली वाढ, उद्योग करण्यातील सुलभतेमधील सुधारणा आणि पायाभूत सुविधांमधील वाढ पाहता केवळ ज्ञात क्षेत्रांमध्येच नव्हे पण जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवण्यात किती कंपन्या उभारून येतील हे पाहण्यात मजा येणार आहे. QCI बद्दल, आणि गुणवत्तेतून आत्मनिर्भरता उपक्रमाबद्दल व त्याचा आपल्या जगण्यावर कसा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी https://www.news18.com/qci/ ला भेट द्या.