मराठी बातम्या /बातम्या /मनी /NPS खातेधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि नॉमिनी नसेल तर पैसे कसे मिळवायचे?

NPS खातेधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि नॉमिनी नसेल तर पैसे कसे मिळवायचे?

file photo

file photo

नॅशनल पेन्शन सिस्टीमध्ये मॅच्युरिटीनंतर दोन फायदे मिळतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

    मार्केट लिंक्ड स्कीम असल्यामुळे अन्य बचत योजनांच्या तुलनेत नॅशनल पेन्शन सिस्टीममधल्या बचतीतून चांगला परतावा मिळतो. ही सरकारद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती निधी योजना आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीमध्ये मॅच्युरिटीनंतर दोन फायदे मिळतात. याचा पहिला फायदा म्हणजे या निधीचा 60 टक्के भाग एकत्रितपणे काढता येऊ शकतो. त्याच वेळी उर्वरित 40 टक्के वार्षिकी अर्थात अ‍ॅन्युइटी म्हणून खरेदी करता येतो. यामुळे सेवानिवृत्तीनंतर एक ठरावीक उत्पन्न मिळतं.

    ही वार्षिकी पेन्शन समजू शकता. योजनेच्या मुदतीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनीला एकरकमी पैसे मिळतात. त्याला हवं असेल तर तो अ‍ॅन्युइटीसाठीदेखील अर्ज करू शकतो. अन्यथा त्याला एकत्रितपणे 100 टक्के निधी दिला जातो. आता इथे एक प्रश्न येतो, की जर खातेदाराने कोणालाही नॉमिनी अर्थात वारसदार केलं नसेल तर काय होतं. सर्वप्रथम हे घडणं खूप कठीण आहे आणि जरी तसं झालं तरी हा पैसा खातेदाराच्या कायदेशीर वारसांकडे किंवा कुटुंबीयांकडे जातो.

    कोण असेल उत्तराधिकारी?

    खातेदाराचा उत्तराधिकारी त्याच्या कुटुंबातला कोणीही सदस्य असू शकतो. त्याचा जोडीदार, अपत्य किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य जो तो खातेदाराचा वारस असल्याचं सिद्ध करू शकतो. त्यासाठी त्याला संबंधित अधिकारी किंवा त्याच्या क्षेत्रातल्या न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र आणावं लागेल. नॉमिनी असेल तरी कधीकधी पैसे वारसाकडे जाऊ शकतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खातेदाराने केलेलं नामनिर्देशन वैध नसेल तर अशा परिस्थितीत हे घडतं.

    हेही वाचा - Life Insurance निवडताना या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर होईल नुकसान

    दावा कसा करायचा?

    निधीवर दावा अर्थात क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रं असणं गरजेचं आहे. यात खातेदाराचं मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारस प्रमाणपत्र/ वारस प्रमाणपत्र, केवायसी दस्तऐवज आणि बँक खात्याचा पुरावा ( नॉमिनी आणि कायदेशीर वारसाचा) यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रं डेथ विड्रॉवल फॉर्मसोबत जोडावी लागतात.ही कागदपत्रं पॉइंट ऑफ प्रेझेन्सकडे (पीओपी) जमा करावी लागतात.

    कागदपत्रं मिळाल्यानंतर पीओपीकडून त्याची पडताळणी केली जाते आणि पैसे काढण्यासाठीचा विनंती अर्ज प्रोटियन सीआरद्वारे पुढे पाठवला जातो. त्यानंतर जी काही रक्कम असेल ती दावेदाराच्या खात्यावर जमा होतो. त्याने अ‍ॅन्युइटीचा पर्याय निवडला असेल तर त्याची माहिती त्याने निवडलेल्या अ‍ॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरला पाठवली जाते. अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि योग्य व्यक्तीस पैसे दिले जातात.

    First published:

    Tags: Insurance, Money, Pension