जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Brands: जगभरात प्रसिद्ध आहेत 'हे' भारतीय ब्रँड, विदेशातील लोकांनाही लावलंय वेड!

Indian Brands: जगभरात प्रसिद्ध आहेत 'हे' भारतीय ब्रँड, विदेशातील लोकांनाही लावलंय वेड!

जगभरात प्रसिद्ध आहेत हे भारतीय ब्रँड्स

जगभरात प्रसिद्ध आहेत हे भारतीय ब्रँड्स

Indian Brands: भारतातील असे अनेक ब्रँड्स आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र भारतीयांना हे ब्रँड्स परदेशातील आहे असं वाटतं. आज आपण अशाच प्रसिद्ध 10 ब्रँड्सविषयी जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Indian Brands: स्टार्टअप इंडिया सारख्या अभियानात भारतात जास्तीत जास्त लोकांना आपला बिझनेस सुरु करण्याची आणि एक उद्योगपती बनण्याची प्रेरणा मिळाली आहे. पण आपल्या देशात ही काही नवीन गोष्ट नाही. येथील अनेक उद्योगपती हे जगभरात आपली ताकद दाखवून आले आहेत. यामध्ये एक दोन नाही तर अनेक भारतीय कंपन्यांचा समावेश आहेत. ज्या भारतात सुरु झाल्या आहेत मात्र आज परदेशातही ते प्रसिद्ध आहेत. टाटा ग्रुप आणि अमूलचं नाव तर आज सर्वांनाच माहितीये. पण यासोबतच अशा अनेक कंपन्या आहेत ज्या विदेशातील लोकांनाही वेड लावतात. ज्या कंपन्यांची सुरुवात खूप छोट्या स्तरावरुन झाली होती. मात्र मालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मेहनतीने आणि गुणवत्तेने आपला कामाला ब्रँड बनवले. अशाच 10 भारतीय कंपन्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. 1. पार्ले-जी पार्ले-जी बिस्किटे भारतात रस्त्याच्या कोपऱ्यातील दुकानांपासून सुपरमार्केटपर्यंत विकली जातात. 1929 मध्ये रेशीम व्यापारी मोहनलाल दयाल यांनी मुंबईतील विलेपार्ले परिसरात जुना बंद पडलेला कारखाना विकत घेतला. याला एक कन्फेक्शनरी प्रमाणे सुरु केलं. त्यांच्यावर स्वदेशी चळवळीचा प्रभाव होता. नंतर त्यांनी जर्मनीला जाऊन कन्फेक्शनरी बनवण्याची कला आत्मसात केली. 1929 मध्येच ते कन्फेक्शनरी मेकिंग मशीन घेऊन भारतात परतले आणि कुटुंबातील 12 सदस्यांसह काम सुरू केले. भारतात हे बिस्किट लवकरच प्रसिद्ध झालं. आज देशभरात पार्ले-जीच्या 130 पेक्षा जास्त कारखाने आहेत. 21 पेक्षा जास्त देशात पार्ले जी प्रोडक्ट्स एक्सपोर्ट केले जातात. Most Expensive Hotel In The World: जगातील सर्वात महागडं हॉटेल, एका दिवसाच्या भाड्यात येईल आलीशान घर! 2. वाडीलाल अहमदाबादच्या वाडीलाल गांधी यांनी 1907 मध्ये वाडीलालची सुरुवात केली होती. गुजरातमधील वाडीलाल ब्रँडने चार पिढ्यांपेक्षा जास्त काळ प्रवास केलाय. हा ब्रँड आज देशातील एक प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँड आहे. ब्रँडने पारंपारिक कोठी (हाताने चालणाऱ्या स्वदेशी आईस्क्रीम मशीन) तंत्रज्ञान वापरून आईस्क्रीमची विक्री सुरू केली. आज 200 हून अधिक फ्लेवर्सचे आईस्क्रीम ग्राहकांना मिळता. हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे. 3. कल्याण ज्वेलर्स कल्याण ज्वेलर्सची सुरुवात ही एका लहान व्यवसायाने झाली होती. मात्र याचे अध्यक्ष आणि एमडी, टी.एस. कल्याणरामन हे आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. कल्याण ज्वेलर्सची स्थापना केरळच्या तिरुसुर जिल्ह्यात 1993 मध्ये झाली. सध्या त्यांचे जवळपास 105 शोरूम आहेत जे भारत आणि पश्चिम आशियात आहेत. ‘पैशांचं गवत’! एकदा लावलं की 5 वर्षे कमाई; प्रत्येक वर्षाला लाखो रुपये मिळतील 4. हायडिझाइन चामड्याच्या वस्तू बनवण्याचा छंद म्हणून सुरू झालेलं हे काम भारतासह 23 देशांमध्ये शोरूम्ससह कोट्यवधींचा व्यवसाय बनलाय. HiDesign हा एक प्रीमियम ब्रँड आहे जो चामड्याच्या पिशव्या आणि बेल्टचा तयार करतो. पाँडेचेरीच्या दिलीप कपूर यांनी 1978 साली वर्कशॉप म्हणून हे काम सुरू केले. पण आज HiDesign त्याच्या दर्जेदार आणि कस्टमाइज़्ड वस्तूंसाठी जागतिक ब्रँड बनला आहे. 5. कॅफे कॉफी डे कॉफी किंग व्ही.जी. सिद्धार्थ यांना आपले करिअर इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून करायचे होते. व्हीजीचा जन्म कर्नाटकातील चिक्कमगालुरू जिल्ह्यात एका कुटुंबात झाला. हे कुटुंब वर्षानुवर्षे कॉफीची शेती करत होते. व्ही.जी सिद्धार्थ देखील कॉफीपासून फार काळ दूर राहू शकले नाहीत. त्यांनी काही कॉफी फार्म विकत घेतले आणि मग कॅफे कॉफी डे सुरू केला. CCD हे आज देशातील अनेक तरुणांचे आवडते ठिकाण आहे आणि देशभरात अनेक आउटलेट आहेत. 6. माँटे कार्लो हिवाळ्यातील प्रत्येक भारतीयाची पहिली पसंती मॉन्टे कार्लो स्वेटर्स आणि जॅकेट्स आहेत. लुधियानामधील मॉन्टे कार्लोचा इतिहास 1949 मध्ये स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या ओसवाल वूलन मिल्सपासून सुरू होतो. 1984 मध्ये, मॉन्टे कार्लो लाँच करण्यात आले. ओसवाल वुलन मिल्स अंतर्गत ब्रँड म्हणून नाव कमावले. हा भारतातील पहिल्या फॅशन परिधान ब्रँडपैकी एक आहे. 7. फ्लाइंग मशीन स्वदेशी चळवळीचा एक भाग असलेल्या अहमदाबादच्या अरविंद मिल्सनेही देशाला पहिला घरगुती जीन्स ब्रँड दिलाय. हे 1980 मध्ये लाँच करण्यात आले. ज्यावेळी आपण फक्त बाहेरच्या देशांतून जीन्स खरेदी करायचो. परवडणाऱ्या किमतीत ते भारतीयांसाठी डिझाइन करण्यात आले. ते 1994 पर्यंत भारतात ब्रँडेड जीन्समध्ये अग्रेसर बनले आणि अजूनही एक ट्रेंडी आणि प्रीमियम ब्रँड म्हणून पाहिले जाते. 8. सर्वाना भवन हॉटेल सर्वाना भवन, जगातील सर्वात मोठी दक्षिण भारतीय रेस्टॉरंट चेन आहे. याची स्थापना 1981 मध्ये चेन्नई, तामिळनाडूत झाली. त्याची भारतात 33 आणि दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मध्य पूर्व, युरोप आणि उत्तर अमेरिकेसह 22 देशांमध्ये 78 आउटलेट आहेत. त्याची सुरुवात अत्यंत गरीब कुटुंबातील पी राजगोपाल यांनी केली होती. 9. ओल्डमॉन्क ओल्ड मॉन्क रम ही एक प्रतिष्ठित भारतीय डार्क रम आहे. जी 1954 मध्ये लाँच झाली होती. देशातच नाही तर परदेशातही याला पसंती दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की याचे उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये होते. 10. लूम सोलर लूम सोलर ही भारतातील आघाडीची सोलर पॅनेल कंपनी आहे. ज्याची स्थापना ब्रदर्सची जोडी अमोल आणि आमोद आनंद यांनी केली आहे. देशात ज्याप्रकारे सोलर उत्पादनांची मागणी वाढतेय. त्यामुळे सौरऊर्जेशी संबंधित या छोट्या ब्रँडने अल्पावधीतच देशभर प्रसिद्धी मिळवली आहे. दोन भावांनी 2018 मध्ये फरीदाबादमध्ये लूम सोलर लाँच केले. ज्याने अवघ्या एका वर्षात 25 कोटी रुपयांची उलाढाल केली. आज देशातील हजारो घरांमध्ये लूम सोलर बसवण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात