नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : केंद्र सरकारने छोट्या उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलं आहे. याच कारणामुळे अनेक जण असे छोटे उद्योग करण्यासाठी पुढे येत आहेत. खादी ग्रामाद्योग विभागाने मधाच्या उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या उपक्रमातला एक यशस्वी प्रकल्प आहे, गुजरातच्या पालनपूरमध्ये राहणाऱ्या शबाना पठाण यांचा.
डेअरीमध्ये मधाची विक्री
खादी ग्रामोद्यागच्या 'हनी मिशन' अंतर्गत शबाना यांना मधनिर्मितीसाठी 10 बॉक्स देण्यात आले होते. सुमारे 13 महिन्यांनतर शबाना यांच्याकडे असे 130 बॉक्स आहेत त्यामध्ये त्या 3 हजार 300 किलो शुद्ध मधाचं उत्पादन होतं. एवढंच नाही त्या एका डेअरीमध्ये मधाची विक्रीही करतात. या मधाचा दर 130 रुपये किलो आहे. मधाच्या विक्रीतून त्या साडेचार लाख रुपये कमवतात.
Met Shabana Pathan a beekeeper from Palanpur,Gujarat who was given10 bee Boxes in Dec 2018 under Honey Mission.She has now 130 bee Boxes & so far extracted 3300 kg honey. Supplying to Banas Dairy @ Rs130/kg. Congratulations.@PMOIndia,@naqvimukhtar pic.twitter.com/N6nfuUU5TF
— Chairman KVIC (@ChairmanKvic) February 8, 2020
SBI मध्ये खातं असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत करा हे काम नाहीतर खातं होईल ब्लॉक
ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा उपक्रम
'हनी मिशन' नुसार खादी ग्रामोद्योगने भारताला मध उत्पादन करणारा सगळ्यात मोठा देश बनवण्याचा संकल्प केला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खादी ग्रामोद्योगने 1 लाख 29 हजार 469 बॉक्सचं वाटप केलं आहे. त्याचबरोबर सुमारे 13 हजार लोकांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अशाच प्रकारे तुम्हीही लघुद्योगामध्ये लाखोंची कमाई करू शकता. मधमाशांचं पालन हे शेतीच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे.
=============================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Honeybee, Khadi gramodyog