मुंबई, 09 सप्टेंबर : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आज दिल्लीत सोन्याच्या किमतीत 300 रुपयांची घट झालीय. यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39,225 रुपये झालीय. तज्ज्ञांच्या मते मजबूत झालेला रुपया आणि सोन्याची मागणी कमी झाल्यानं ही घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,506 डाॅलर प्रति औंस आहे. तर चांदी 18.05 डाॅलर प्रति औंस आहे.
दिल्लीत 99.9 टक्के सोनं 300 रुपयांनी कमी झालंय. सोन्याच्या घसरणीबरोबर चांदीही घसरलीय. चांदीमध्ये 1400 रुपयांची घट झालीय. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 48,500 रुपये झालीय. सिक्का कारभाऱ्यांमध्ये लिवाली कमी झाल्यानं चांदी घसरलीय.
आधार कार्डात बदल करायचा असेल तर 'अशी' घ्या ऑनलाइन अपाॅइंटमेंट
आज (9 सप्टेंबर) डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झालाय. 14 पैशांच्या मजबुतीनं डाॅलरच्या तुलनेत रुपया 71.58 रुपये झाला.
शनिवारी सोन्या-चांदीची किंमत पाहता, सोनं 39,525 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं आणि चांदी 49,900 रुपये प्रति किलोग्रॅम होती.
कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल
पुढील महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.
SBI नं दिली ग्राहकांना खास भेट, आता 'इतका' कमी होणार तुमचा EMI
यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असण्याची शक्यता मुंबईतील सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे. दिवाळीपर्यंत सोने 38 हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 45 हजारावर पोहोचू शकतात.
VIDEO :...म्हणून वंचितमधून बाहेर पडलो, 'त्या' बैठकीत काय घडलं जलील यांनी केलं उघड