मुंबई, 30 सप्टेंबर : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 240 रुपयापर्यंत घसरलीय. तर 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 775 रुपयांनी स्वस्त झालीय. आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव पडल्यानं सोन्याच्या किमती कमी झाल्यात.
सोन्याचा नवा भाव
सोमवारी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याची किंमत 240 रुपयांनी कमी होऊन 38,530 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,487.15 डाॅलर प्रति औंस आणि चांदी 17.24 डाॅलर प्रति औंस झालीय.
भारतीय सैन्यात ग्रॅज्युएट्ससाठी बंपर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज
चांदीही झाली स्वस्त
सोन्याप्रमाणे चांदीची किंमतही कमी झालीय. 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 46,480 रुपये झालाय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाल्यानं सोनं स्वस्त झालं.
2 ऑक्टोबरपासून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 50 हजारापेक्षा जास्त कमाई
कसं ओळखायचं अस्सल सोनं?
दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.
खूशखबर! Volkswagen च्या 'या' गाड्यांवर बंपर ऑफर, 4.5 लाख रुपयांपर्यंत सूट
पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.
सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.
चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.
VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा