मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय लष्करात धार्मिक शिक्षकांसाठी बंपर व्हेकन्सी निघालीय. यात 152 पोस्टवर भरती असणार आहे. या पदांसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालीय. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
उमेदवाराची निवड लिखित परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. लिखित परीक्षेचं आयोजन 23 फेब्रुवारी 2020 ला केलं जाईल. धार्मिक शिक्षक सैनिकांमध्ये धार्मिक ग्रंथांचा प्रचार करतात आणि रेजिमेंटल आणि युनिटमध्ये वेगवेगळ्या विधींचं संचालन करतात.
2 ऑक्टोबरपासून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 50 हजारापेक्षा जास्त कमाई
या तारखा महत्त्वाच्या
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 30 सप्टेंबर
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर
खूशखबर! Volkswagen च्या 'या' गाड्यांवर बंपर ऑफर, 4.5 लाख रुपयांपर्यंत सूट
कुठल्या विभागात किती पदं?
पंडित - 118 पदं
पंडित (गुरखा)- 7 पदं
ग्रंथी- 9 पदं
मौलवी (सुन्नी)- 9 पदं
लडाखसाठी मौलवी (शिया)- 1 पद
पाद्री- 4 पदं
लडाख स्काउटसाठी बौद्ध भिक्षू (महायान) – 4 पदं
ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँकांना सुट्ट्या, 'ही' आहे पूर्ण लिस्ट
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीचा पदवीधर हवा. किंवा संबंधित विषयांमधली डिगरी हवी.
तसंच बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँकेत 199 जागा भरायच्या आहेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM या पदांसाठी जागा भरायच्या आहेत.
1 सप्टेंबर 2019 रोजी वय 25 ते 30 वर्षापर्यंतच हवं. SC आणि ST ला 5 वर्ष सवलत आहे, तर OBC साठी 3 वर्ष सवलत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ इथे क्लिक करा.
अर्जाची फी सर्वसामान्यांसाठी 850 रुपये आणि आरक्षितांसाठी 100 रुपये आहे.
साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा