खूशखबर! Volkswagen च्या 'या' गाड्यांवर बंपर ऑफर, 4.5 लाख रुपयांपर्यंत सूट

खूशखबर! Volkswagen च्या 'या' गाड्यांवर बंपर ऑफर, 4.5 लाख रुपयांपर्यंत सूट

Volkswagen, Discount - तुम्ही कार घेणार असाल तर फाॅक्सवॅगन कार्सवर तुम्हाला चांगलीच सवलत मिळतेय

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : जे कोणी कार खरेदी करणार असतील, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. फाॅक्सवॅगन आपल्या कारवर 4.5 लाख रुपयांपर्यंत सवलत देतेय. फाॅक्सवॅगननं Polo, Vento, Ameo आणि Tiguan चे डिजल वेरिएंट्सचं काॅर्पोरेट एडिशन लाँच केलंय. आता कंपनी याच माॅडेल्सच्या काॅर्पोरेट एडिशनवर मोठी सूट देतंय.काॅर्पोरेशन एडिशनच्या कार फक्त काॅर्पोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील, चार्टर्ड अकाउंट्स आणि आर्किटेक्चर्स खरेदी करतात. कुठल्या कारवर किती डिस्काउंट मिळतोय, ते पाहा.

Volkswagen Polo

पोलो हॅचबॅकच्या डिजल हायलाइन व्हेरिएंटवर 1.16 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट आणि फायदे मिळतायत.

1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी बदलतायत, नेहमीच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

Volkswagen Vento

या सिडान कारला डिजल वेरिएंट 9.99 लाख रुपयांचं स्पेशल प्राइस मिळणार आहे. सोबत यावर स्पेशल प्राइसशिवाय 90 हजार रुपयांपर्यंत आणखी फायदेही मिळतायत.

ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँकांना सुट्ट्या, 'ही' आहे पूर्ण लिस्ट

Volkswagen Ameo

या काॅम्पॅक्ट सिडान गाडीच्या सर्व डिजल वेरिएंटसवर 1.31 लाख रुपयापर्यंत मोठी सवलत मिळतेय.

मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण

Volkswagen Tiguan

या एसयुव्हीच्या mid-spec Comfortline variant वर सर्वात जास्त 4.50 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळतंय. या डिस्काउंटसोबत काॅर्पोरेट एडिशन युनिट्सवर 5 वर्षांची वाॅरंटी मिळतेय.

VIDEO : शरद पवारांसोबत बैठकीत काय घडलं? अजितदादांनी केला खुलासा

Published by: Sonali Deshpande
First published: September 28, 2019, 5:39 PM IST
Tags: Volkswagen

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading