Home /News /news /

2 ऑक्टोबरपासून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 50 हजारापेक्षा जास्त कमाई

2 ऑक्टोबरपासून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 50 हजारापेक्षा जास्त कमाई

Business, Money, Mudra Yojana - तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर या व्यवसायाचा विचार नक्की करा

    मुंबई, 30 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात देशाच्या जनतेला सांगितलं की 2 ऑक्टोबरपासून पूर्ण प्लॅस्टिक बंदी आहे. कुणीही प्लॅस्टिकचा वापर करू नका. प्लॅस्टिकच्या कपांवर बंदी आल्यानंतर आता दुसऱ्या व्यवसायाची संधी हात जोडून उभी आहे. त्याबद्दलच आम्ही माहिती देतो. प्लॅस्टिक बंद झाल्यामुळे चहा-पाणी, लस्सी, कोल्ड ड्रिंक यांसारखी पेय पिण्यासाठी पेपर कपची मागणी वाढणार. तुम्ही पेपर कप तयार करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यातून तुम्ही दर महिन्याला 60 हजार रुपये कमवू शकता. PMC बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई किती गुंतवणूक करू शकता? तुम्हाला छोट्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल तर 1 ते 1.50 लाखापर्यंत पैसे तुम्ही गुंतवू शकता. यातून तुम्ही 90 ते 200 एमएलपर्यंतच्या ग्लास आणि कपचं प्राॅडक्शन करू शकता. यासाठी तुम्ही छोटी-मोठी, अॅटोमॅटिक, सेमी अॅटोमॅटिक अनेक प्रकारच्या मशीन्स वापरू शकता. छोटी मशीन एकाच आकाराचे कप बनवतात, तर मोठ्या मशीन्स अनेक आकारांचे कप आणि ग्लासेस बनवतात. 1 ते 2 लाख रुपयांत तुम्हाला एकाच आकाराचे कप तयार करणारं मशीन मिळतं. अनेक आकाराचे कप बनवण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. खूशखबर! Volkswagen च्या 'या' गाड्यांवर बंपर ऑफर, 4.5 लाख रुपयांपर्यंत सूट व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी मशीनरी, पेपर कप फ्रेमिंग मशीन 5 लाखापर्यंत, ऑफिस साधनं 50 हजार रुपयापर्यंत, कच्चा माल म्हणून पेपर रील लागेल. ते 90 रुपये किलोग्रॅम आहे. सोबत बाॅटम रील हवं असेल तर 78 रुपये किलोग्रॅम खरेदी करता येईल. 1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी बदलतायत, नेहमीच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम कुठे मिळेल मशीन? कागदाचे कप तयार करणाऱ्या मशीन्स दिल्ली, हैदराबाद, आग्रा तसंच अहमदाबादसारख्या अनेक शहरांमध्ये मिळतात. इंजिनियरिंग काम करणाऱ्या कंपन्या अशी मशीन्स तयार करतात. याशिवाय इंडिया मार्ट वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही मशीन विकणाऱ्यांकडे संपर्क करू शकता. तुम्ही पेपर कप तयार करण्यासाठी कच्चा माल खरेदी करू शकता. कशी होईल कमाई? फॅक्टरी 1 मिनिटात 50 कप तयार करते.रोज 2 शिफ्टमध्ये काम होतं. महिन्यात इथे 15,60,000 कप बनतात. तुम्ही हे कप 30 पैसे अशी कमी हिशेबात विकले तर तुम्हाला जवळजवळ 4,68,000 पैसे मिळतील, यात  408,964 रुपये खर्च वजा केला तर तुम्हाला 59,036 रुपये कमाई होऊ शकते. कसं करणार रजिस्ट्रेशन? छोट्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही घरीच छोटी मशीन बसवून व्यवसाय सुरू करू शकता. मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर एमएसएमईअंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुम्हाला मुद्रा लोनही मिळू शकतं. VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड
    Published by:Sonali Deshpande
    First published:

    Tags: Plastic

    पुढील बातम्या