पितृपक्षामुळे सोन्या-चांदीची मागणी घटली, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

पितृपक्षामुळे सोन्या-चांदीची मागणी घटली, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करायला जाणार असाल तर आधी हे दर पाहा

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमतीत दुसऱ्या दिवशी घसरण झालीय. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचादर 121 रुपये कमी झालाय. तर चांदी 851 रुपये स्वस्त झालीय. एक किलोग्रॅम चांदी 851 रुपयांनी स्वस्त झालीय.सराफा बाजारातून कळलेल्या माहितीनुसार सध्या पितृपक्ष सुरू असल्यानं सोन्याची मागणी कमी झालीय. शिवाय शेअर बाजार तेजीत असल्यानं लोक पुन्हा तिथे वळलेत.

सोनं खरेदी करणं लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालं स्वस्त

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 121 रुपये कमी होऊन 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 497 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,685 रुपये झाली होती.

SBI, RBI आणि इतर बँकांमध्ये 12,899 व्हेकन्सी, 'इथे' करा अर्ज

चांदीही झाली स्वस्त

सोन्याप्रमाणे चांदीही स्वस्त झाली. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 47,235 रुपयांवरून 46,384 रुपये झालीय.

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा, मिळाली 'इतकी' मदत

का कमी झाल्या किमती?

तज्ज्ञांच्या मते सध्या पितृपक्ष असल्यानं सोन्याची खरेदी होत नाहीय. मागणी कमी झाल्यानं किंमतही कमी झालीय. शिवाय शेअर बाजारातही दिवाळी आल्यानं लोक शेअर्सकडे वळले.

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

'या' तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडकला भलामोठा अजगर, सुटकेचा LIVE VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: September 27, 2019, 6:36 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading