मुंबई, 21 सप्टेंबर : डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. इंडियन ऑइल काॅर्पोरेशनच्या माहितीनुसार आज दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमतीत 24 ते 31 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 24 ते 26 पैसे प्रति लीटर वाढलंय. शुक्रवारी पेट्रोलच्या किमतीत 34 ते 37 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 ते 30 पैसे प्रति लीटर वाढलंय.
दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 73.35 रुपये आहे. शुक्रवारी ती 73.06 रुपये प्रति लीटर होती. यानंतर डिझेलचा दर 66.53 रुपये प्रति लीटर झालाय. शुक्रवारी डिझेलचा भाव 66.29 रुपये प्रति लीटर होता. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 25 पैसे प्रति लीटर वाढून 69.79 रुपये प्रति लीटर झालाय. शुक्रवारी मुंबईत डिझेलचा दर 69.54 रुपये प्रति लीटर होता.
सोनं-चांदी झालं स्वस्त, 'हे' आहेत शुक्रवारचे दर
चेन्नईत एक लीटरचा दर 31 पैसे प्रति लीटर वाढलाय. तो 76.24 रुपये प्रति लीटर झालाय. तर डिझेल 26 पैशांनी वाढलंय. चेन्नईत 1 लीटरचा डिझेलचा दर 70.33 रुपये झालाय.
'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई
रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.
अशी मिळवा माहिती
विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.
SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता झीरो बॅलन्स अकाउंटचे मिळतील 'हे' फायदे
एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122
या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.
VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा