मुंबई, 20 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काॅर्पोरेट करात कपात करून कंपन्यांना दिलासा दिलाय. त्यामुळे अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झालाय. त्यामुळे आज चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झालीय. दिल्लीत आज (20 सप्टेंबर) 10 ग्रॅम सोन्याची किंमत 170 रुपये कमी झालीय. तर चांदीत 120 रुपयांनी घट झालीय. चांदी आता 47,580 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. गेले चार दिवस सोन्याचे दर 700 रुपयांनी कमी झालेत. सोन्याचा नवा दर HDFC सिक्युरिटीजच्या माहितीनुसार दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 38,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 38,390 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी चांदीची नवी किंमत चांदीतही घट झालीय. चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 47700 रुपयांवरून 47,580 रुपये झालीय. SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता झीरो बॅलन्स अकाउंटचे मिळतील ‘हे’ फायदे का कमी झाल्या किमती? तज्ज्ञांच्या मते सध्या पितृपक्ष असल्यानं सोन्याची खरेदी होत नाहीय. मागणी कमी झाल्यानं किंमतही कमी झालीय. शिवाय शेअर बाजारातही दिवाळी आल्यानं लोक शेअर्सकडे वळले. ‘या’ व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई कसं ओळखायचं अस्सल सोनं? दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात. पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं. सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे. चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे. मोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.