मुंबई, 20 सप्टेंबर : सौदी अरेबियात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या देशातून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सौदीतल्या अराम्को तेल कंपनीला या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग झालंय. मुंबईत 34 पैसे प्रति लीटर महाग तर चेन्नईत 37 पैसे प्रति लीटर महाग झालंय.गेल्या दोन महिन्यातली पेट्रोल आणि डिझेलची ही वाढ सर्वात जास्त आहे. गेल्या 4 दिवसात दिल्लीत पेट्रोल 1.03 रुपये प्रति लीटर महाग झालं होतं, तर डिझेलचे भाव 86 पैसे प्रति लीटर वाढलेले.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार शुक्रवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 73.06 रुपये, 78.73 रुपये, 75.77 रुपये आणि 75.93 रुपये प्रति लीटर आहे. चार महानगरांमध्ये डिझेलचे भाव क्रमश: 66.29 रुपये, 69.54 रुपये, 68.70 रुपये आणि 70.07 रुपये प्रति लीटर झालेत.
खूशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, 'हे' आहेत गुरुवारचे दर
रोज 22 रुपये खर्च करून घेता येईल LIC पाॅलिसी, मिळतील 'हे' फायदे
कसे ठरतात दर?
रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.
इन्कम टॅक्स विभागानं केलं सावध, 'हा' SMS आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं खातं
अशी मिळवा माहिती
विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.
एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122
या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.
SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान