खूशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्यात, किती ते घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 05:58 PM IST

खूशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, 'हे' आहेत गुरुवारचे दर

मुंबई, 19 सप्टेंबर : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 270 रुपये कमी झालीय. सोन्याप्रमाणे चांदी 380 रुपयांनी कमी होऊन चांदीची किंमत 47,310 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. गेले तीन दिवस सोन्याचा दर 635 रुपयांनी कमी होऊन 38,454 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलाय.

लागोपाठ तीन दिवस सोनं खरेदी झालं स्वस्त

दिल्लीत 99.9 शुद्ध सोन्याची किंमत 270 रुपयांनी कमी होऊन 38,454 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

रोज 22 रुपये खर्च करून घेता येईल LIC पाॅलिसी, मिळतील 'हे' फायदे

चांदीची नवी किंमत

Loading...

मागणी कमी झाल्यानं चांदीही स्वस्त झालीय. गुरुवारी चांदीची किंमत 47,690 रुपये प्रति किलोग्रॅमवरून 47,310 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

इन्कम टॅक्स विभागानं केलं सावध, 'हा' SMS आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं खातं

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

पेट्रोल-डिझेल पुन्हा झालं महाग, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 19, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...