मुंबई, 18 सप्टेंबर : रेल्वे प्रवासात खराब आणि शिळ्या अन्नाच्या तक्रारी बऱ्याच मिळत असतात. त्या संपवण्यासाठी रेल्वे मंत्रालय नवी सुरुवात करणार आहे. रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाण्याच्या पाकिटावर अन्नपदार्थाबद्दल सर्व माहिती मिळावी म्हणून क्यूआर कोड (QR Code) आवश्यक असेल. त्यासाठी IRCTC नियम तयार करतंय. ही नवी सिस्टिम हळूहळू लागू होईल. रेल्वेच्या जेवणात QR कोड गरजेचा रेल्वेच्या जेवणात QR कोड जरुरी आहे. QR कोडमुळे प्रवाशांना जेवणाबद्दल माहिती मिळेल. या कोडला स्कॅन केल्यावर प्रवाशांना जेवणाचं पॅकिंग कधी, कुठे आणि किती वाजता केलं, याची माहिती मिळेल. शिवाय जेवणाची अचूक किंमत QR कोडनं कळू शकेल. यामुळे अवास्तव पैसे वसूल करण्यावर लगाम लागेल. लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, ‘हे’ आहेत बुधवारचे दर याआधी रेल्वेनं जेवणाची गुणवत्ता आणि जेवण बनण्याची प्रक्रिया प्रवाशांना IRCTC च्या वेबसाइटवर पाहता येईल, ही सोय केली होती. जेवण बनण्याची लाइव्ह स्ट्रिम सुरू केलीय. सणासुदीच्या आधीच मोदी सरकारचं गिफ्ट, ‘इतके’ स्वस्त होणार LED आणि LCD नो बिल, नो पेमेंट रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी अजून एक पाऊल उचललंय. ट्रेन किंवा रेल्वे फलाटावर कुठलाही विक्रेता बिल द्यायला नकार देत असेल तर त्याला पैसे देण्याची गरज नाही, असं सांगितलंय. मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 11 लाख 52 हजार जणांना मोठी गिफ्ट दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट मिळालंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितला. ते म्हणाले या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. या बोनसवर सरकार 2024 कोटी रुपये खर्च करणार आहे. 11 लाख 52 हजार कर्मचाऱ्यांना आता 78 दिवसांचा बोनस मिळणार आहे. दर वर्षी दसऱ्याच्या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेच्या आधारावर बोनस मिळतो. VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं… एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.