सणासुदीच्या आधीच मोदी सरकारचं गिफ्ट, 'इतके' स्वस्त होणार LED आणि LCD

सणासुदीच्या आधीच मोदी सरकारचं गिफ्ट, 'इतके' स्वस्त होणार LED आणि LCD

TV, LED, LCD - LED आणि LCD खरेदी करायचं असेल तर चांगली बातमी आहे

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : सणासुदीच्या काळात मोदी सरकारनं लोकांना मोठा दिलासा दिलाय. लोक आता स्वस्त LED आणि LCD टीव्ही खरेदी करू शकतील. सरकारनं ओपन सेल टीव्ही पॅनलच्या आयातीवरचं 5 टक्के सीमा शुल्क काढून टाकलंय. आता ओपन सेल टीव्ही पॅनलवर कसलंच शुल्क लागणार नाही. या पॅनलचा उपयोग एलईडी (LED) आणि एलसीडी (LCD) टीव्ही बनवण्यासाठी होतो.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे टीव्ही पॅनलच्या किमती जवळजवळ 3 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. ओपन सेल पॅनल टेलिव्हिजन संच बनवण्यातला महत्त्वाचा भाग आहे. टीव्ही सेटमध्ये अर्ध्याहून जास्त याचा हिस्सा असतो.

मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 11 लाख 52 हजार जणांना मोठी गिफ्ट

अर्थमंत्रालयानं मंगळवारी (17 सप्टेंबर) रात्री उशिरा एलसीडी आणि एलईडी टीव्हीमध्ये ओपन सेल टीव्ही पॅनलवर (15.6 इंच आणि त्याच्या वर ) काही शुल्क लागणार नाही. सरकारनं चिप ऑन फिल्म, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबली (PCBA) आणि सेल (ग्लास बोर्ड/सब्सट्रेट)च्या आयातीवर सागणारं सीमा शुल्क रद्द केलंय. याचा उपयोग ओपन सेल टीव्ही पॅनल बनवण्यासाठी केला जातो.

सरकारनं 30 जून 2017ला पॅनलच्या आयातीवर 5 टक्के सीमा शुल्क लावलंय. अनेक टीव्ही निर्माता कंपन्यांनी याला विरोध केला होता.

प्लॅस्टिक बंदीनंतर सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

वेल्डेड स्टिल पाइप, ट्युब यावरची अँटी डंपिंग ड्युटी लागेल, स्वस्त होतील पाइप

सरकारनं स्टिल पाइप, ट्युबवर अँटी डंपिंग ड्युटी लावलीय. चीन आणि व्हिएतनाममधून भारतात डंपिंग होतं. यावर 11 ते 30 टक्क्यापर्यंत अँटी डंपिंग ड्युटी लावलीय. ही 5 वर्षांसाठी लावलीय. चीन आणि व्हिएतनामवरून येणाऱ्या उत्पादनांवर ही ड्युटी लागेल. त्याचा फायदा घरगुती इंडस्ट्रीला होईल.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: September 18, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading