लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, 'हे' आहेत बुधवारचे दर

लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, 'हे' आहेत बुधवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीची खरेदी करणार असाल तर दर कमी झालेत. जाणून घ्या किमती

  • Share this:

 

मुंबई, 18 सप्टेंबर : सराफा बाजारात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 215 रुपयांनी कमी होऊन 38,676 रुपये झालीय. सोन्याबरोबर चांदीची किंमतही कमी झाली. चांदीच्या किमतीत 770 रुपयांची घट झालीय. एक किलो चांदी आता 47,690 रुपये झालीय.

सोनं का झालं स्वस्त?

HDFC सिक्युरीटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे रुपया मजबूत झाला. म्हणून सोन्याची किंमत कमी झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची घसरण होऊन ते 1500 डाॅलर प्रति औंस आहे आणि चांदीही कमी होऊन 17.81 डाॅलर प्रति औंस आहे.

LIC मध्ये नोकरीची मोठी संधी, 8500 जागांवर होणार भरती

दोन दिवसात 300 रुपये स्वस्त सोनं

लागोपाठ 2 दिवस सोनं 365 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालंय. मंगळवारी सोनं 150 रुपये कमी झालं होतं तर बुधवारी त्याच भाव 215 रुपयांनी कमी झाला. दोन दिवसात सोन्याची किंमत 365 रुपये कमी झाली.

ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

प्लॅस्टिक बंदीनंतर सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

Tags: gold
First Published: Sep 18, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading