मुंबई, 17 सप्टेंबर : तुम्ही नोकरी शोधताय? मग मोठी संधी तुमच्यासाठी आहे. LIC मध्ये मेगा भरती आहे. भारतीय आयुर्विमा मंडळात 8500 पदांवर भरती केली जाणार आहे. क्लार्क, कस्टमर सर्विसेस एक्झिक्युटिव्ह, सिंगल विंडो ऑपरेटर या पदांसाठी ही भरती आहे. या 8500 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही https://www.licindia.in/ इथे क्लिक करा. आजपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात झालीय. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019. ऑनलाइन परीक्षेची तारीख आहे 21 आणि 22 ऑक्टोबर 2019. काॅल लेटर डाऊनलोडची तारीख 15 ऑक्टोबर 2019. पूर्व परीक्षेची तारीख आहे 22 ऑक्टोबर 2019. GST काउन्सिलच्या बैठकीत रोजच्या जीवनातल्या ‘या’ गोष्टी होणार स्वस्त अर्जाची फी सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये आहे. तर SC,ST,PWD उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत नोकरीची संधी आहे. 91 जागांवर भरती होणार आहे. डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुमच्या क्रेडिट कार्डावर मिळणाऱ्या ‘या’ 5 सुविधा तुम्हाला माहीत आहेत का? पद आणि पदसंख्या डेव्हलपमेंट असिस्टंट - 82 डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) - 9 सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, पेट्रोल-डिझेल झालं ‘इतकं’ महाग शैक्षणिक पात्रता डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी हवी. आरक्षित उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण असण्याची गरज आहे. डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदासाठी 50% गुणांसह हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवी हवी. आरक्षित उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण असणं हवं. वयाची अट 1 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्ष पूर्ण हवेत. SC/ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट हवी. अर्जाची फी जनरल आणि ओबीसी - 450 रुपये. SC/ST/PWBD/ExSM साठी 50 रुपये. पूर्व परीक्षा 20 ऑक्टोबर 2019ला घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.nabard.org/ इथे क्लिक करा. VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.