प्लॅस्टिक बंदीनंतर सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

Business, Modi Government - मोदी सरकार या व्यवसायासाठी मदत करणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 02:33 PM IST

प्लॅस्टिक बंदीनंतर सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

मुंबई, 18 सप्टेंबर : मोदी सरकारनं 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लॅस्टिक बंदी करायची तयारी केलीय. यामध्ये प्लॅस्टिक बॅग, कप आणि स्ट्राॅ यावर बंदी असेल. प्रदूषणाला असलेली हानी पाहता प्लॅस्टिक बॅग्जचा बिझनेसच बंद होतोय. म्हणूनच आता पेपर बॅगचा व्यवसाय जोम धरतोय. हा रोजगाराचा चांगला पर्याय आहे.

हल्ली कुठल्याही दुकानात ग्राहकांना वस्तू पेपर बॅगमध्येच देतात. त्यामुळे या बॅग्जना मागणी आहे.

'या' बँकेत पैसे ठेवले तर मिळेल कॅशबॅक आणि सोबत भरपूर सुविधा

सरकार देईल 1 कोटींचं कर्ज

तुम्हाला पेपर बॅग बनवायचं युनिट सुरू करायचं असेल तर सरकार तुम्हाला 1 कोटी रुपये कर्ज देऊ शकतं. हे कर्ज तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत मिळेल.

Loading...

किती रुपयात सुरू होईल युनिट?

केंद्र सरकार उद्यमी मित्र योजनेअंतर्गंत युनिट लावण्यासाठी जमीन आणि बिल्डिंग खरेदी केली तर जवळपास 32 लाख रुपये खर्च होईल. तुम्ही भाड्याच्या घरातही हे युनिट खरेदी करू शकता.

जानेवारीनंतर आज सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, 'हे' आहेत आजचे दर

ट्रेनिंगसाठी सरकारची मदत

पेपर पॅकेजिंग प्राॅडक्टससाठी मुंबईची इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पॅकेजिंग संस्था ट्रेनिंग देते. याशिवाय तुम्ही www.udyamimitra.in इथे बरीच माहिती घेऊ शकता.

नोकरदारांना दिवाळीआधी PF मध्ये मिळणार 'इतका' फायदा

मशीनचा खर्च

प्लॅंट आणि मशीनवर 14.65 लाख रुपये खर्च होईल. इतर गोष्टींवर 3 लाख रुपये, पी अँड पी एक्सप्रेसवर 2.15 लाख रुपये, वर्किंग कॅपिटल मार्जिनवर 91.64 लाख रुपये म्हणजे एकूण 1 कोटी 48 लाख रुपयांचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल. वर्किंग कॅपिटलमध्ये राॅ मटेरियलचाही समावेश आहे.

किती होईल फायदा?

पहिल्या वर्षी तुम्हाला 1 लाख 76 हजार रुपये फायदा होईल. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6 लाख 7 हजार रुपये आणि नंतरच्या वर्षी 10 लाख 78 हजार रुपयापर्यंत नफा होईल.  चौथ्या वर्षी 12 लाख 17 हजार आणि पाचव्या वर्षी 13 लाख 56 हजार रुपये नफा होऊ शकतो.

किती मिळेल कर्ज?

सरकारकडून जवळजवळ 1 कोटी 3 लाख रुपये कर्ज मिळेल. तुम्हाला 45 लाख रुपयांची सोय करावी लागेल.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: business
First Published: Sep 18, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...