सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, पेट्रोल-डिझेल झालं 'इतकं' महाग

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, पेट्रोल-डिझेल झालं 'इतकं' महाग

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किती वाढ झालीय ते पाहा

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : सौदी अरबची कंपनी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. यामुळे मंगळवारी (17 सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 16 पैसे प्रति लीटर महाग झालंय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर क्रमश: 72.17 रुपये, 77.85 रुपये, 74.89 रुपये आणि 74.99 रुपये प्रति लीटर आहेत. तसंच डिझेलचे भाव क्रमश: 65.58 रुपये, 68.78 रुपये, 67.99 रुपये आणि 69.31 रुपये प्रति लीटर झालंय.

दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची 'फेस्टिव यात्रा', ग्राहकांसाठी 'या' ऑफर्स

गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेल 4 वेळा महाग झालंय. दिल्लीत पेट्रोल एकूण 21 पैसे प्रति लीटर महाग तर डिझेल 23 पैसे महाग झालंय.याचा परिणाम नेहमीच्या गरजेच्या वस्तू महाग होण्यावर होतो. त्याची झळ सर्वसामान्यांना लागते.

'या' कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत सोमवारचे दर

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! अचानक पैसे लागले तर बँक देते 'ही' सुविधा

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

DRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: September 17, 2019, 11:27 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading