'या' कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत सोमवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीची खरेदी करायला जाणार असाल तर हे दर पाहा

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 06:15 PM IST

'या' कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत सोमवारचे दर

मुंबई, 16 सप्टेंबर : रुपयाची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं आज सोन्याच्या किमती वाढल्यात. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 460 रुपयांनी वाढलाय. सोनं 38,860 रुपये प्रति ग्रॅम झालंय. चांदीची किंमतही वाढलीय. सोमवारी चांदी 1,096 रुपयांनी वाढलीय. त्यामुळे 1 किलो चांदीची किंमत 47,957 रुपये झालीय. एचडीएफसी सिक्युरिटीजप्रमाणे डाॅलरच्या तुलनेत रुपया कमजोर झालाय आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. म्हणून ही वृद्धी झालीय.

आज (16सप्टेंबर) कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. भारतीय रुपया एक डाॅलरच्या तुलनेत 68 पैसे इतका घटलाय. तो 71.60 झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,504 डाॅलर प्रति औंस आणि चांदी 17.87 डाॅलर प्रति औंस आहे.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! अचानक पैसे लागले तर बँक देते 'ही' सुविधा

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

Loading...

पर्सनल लोन घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, नाही तर द्यावं लागेल जास्त व्याज

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता 'यासाठी' द्यावे लागतील जास्त पैसे

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 16, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...