मुंबई, 16 सप्टेंबर : तुमच्या बँकेच्या खात्यात जेवढे पैसे असतात तेवढेच तुम्ही काढू शकता. पण देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना त्यांच्या बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढण्याची सुविधा देते. बँक तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. जाणून घेऊ त्याबद्दल - काय आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा? ओव्हरड्राफ्ट एक प्रकारचं कर्ज आहे. ग्राहक याद्वारे आपल्या बँक अकाउंटपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. ते पैसे दिलेल्या अवधीत चुकवावे लागतात. त्यावर व्याजही लागतं. व्याज रोजच्या हिशेबानं मोजलं जातं. ओव्हरड्राफ्टची सुविधा कुठलीही बँक किंवा नाॅन बँकिंग फायनॅन्शियल कंपन्या (NBFC) देतात. ओव्हरड्राफ्टची मर्यादा काय असेल हे बँक किंवा नाॅन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी ठरवते. पर्सनल लोन घेताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाही तर द्यावं लागेल जास्त व्याज मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना, मग मुलासाठी ‘हे’ करायलाच हवं असा करू शकता अर्ज बँक आपल्या काही ग्राहकांना प्रीअप्रुव्हड सुविधा देते. तर काही ग्राहकांना वेगळी मंजुरी घ्यावी लागते. यासाठी तुम्हाला लिखित किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करायला हवा. काही बँका अशा सुविधांसाठी प्रोसेसिंग फीज वसूल करतात. ओव्हरड्राफ्ट दोन प्रकारचे असतात. एक सिक्युर्ड आणि दुसरा अनसिक्युर्ड. सिक्युर्ड ओव्हरड्राफ्टसाठी काही गोष्टी तारण ठेवाव्या लागतात. ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता ‘यासाठी’ द्यावे लागतील जास्त पैसे तुम्ही एफडी, शेअर्स, घर, पगार, इन्शुरन्स पाॅलिसी, बाॅण्ड्स या गोष्टी तारण ठेवून ओव्हरड्राफ्ट मिळवू शकता. तुमच्याकडे सिक्युरिटीसाठी काही नसेल तर अनसिक्युर्ड ओव्हरड्राफ्ट घेता येतो. उदाहरण क्रेडिट कार्डावर विथड्राॅल करू शकता. मिळतो हा फायदा तुम्ही कर्ज घेता तेव्हा ते चुकवण्याचा काही काळ ठरलेला असतो. कर्ज ठरलेल्या अवधीआधी चुकवलं तर प्रीपेमेंटचा चार्ज द्यावा लागतो. पण ओव्हरड्राफ्टबाबत असं होत नाही. तुम्ही ठरलेल्या अवधीआधी कुठलाही चार्ज न देता पैसे देऊ शकतो. सोबत व्याजही तेवढ्याच काळाचं द्यावं लागतं. VIDEO: ‘…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.