दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची 'फेस्टिव यात्रा', ग्राहकांसाठी 'या' ऑफर्स

#AmazonFestiveYatra - तुम्हाला शाॅपिंगची खूप संधी. जाणून घ्या त्याबद्दल-

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 07:26 PM IST

दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची 'फेस्टिव यात्रा', ग्राहकांसाठी 'या' ऑफर्स

मुंबई, 16 सप्टेंबर : सणासुदीचे दिवस जवळ येत चाललेत. त्याआधीच अमेझाॅननं 'फेस्टिव यात्रा' सुरू केलीय. सोबत कंपनीनं ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची घोषणा केलीय. अमेझाॅनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019पर्यंत चालणार आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करता यावं म्हणून कंपनीनं फेस्टिव यात्रा सुरू केलीय. अमेझाॅन ही यात्रा घेऊन 13 शहरांमध्ये जाईल. सहा हजार किमीहून जास्त प्रवास करून ग्राहकांना भेटेल. कंपनीचा दावा आहे की या सेलमध्ये ग्राहकांना शानदार ऑफर्स आणि कॅशबॅक तर मिळेलंच, पण प्राॅडक्टही भरपूर असतील. या सेलमध्ये ग्रामीण भागातले विक्रेते आणि स्टार्टअप भाग घेतील.

'या' कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत सोमवारचे दर

तीन ट्रक जोडून तयार केलं स्पेशल होम

कंपनीनं आज दिल्लीहून #AmazonFestiveYatra या यात्रेची सुरुवात केली. या दरम्यान तीन ट्रक्सवर स्पेशल होम तयार केलंय. त्यात दाखवलंय की लोकांना कशा शानदार वस्तू मिळणार आहेत. या स्पेशल होमचं नाव कंपनीनं 'हाऊस ऑफ व्हील्स' ठेवलंय.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! अचानक पैसे लागले तर बँक देते 'ही' सुविधा

Loading...

या शहरांत जाणार यात्रा

अमेझाॅन आपली यात्रा मुंबई, आग्रा, चेन्नई, इंदौर, कोलकाता, कोची, मथुरा, लखनऊ, अहमदाबाद, हैद्राबाद आणि विशाखापट्टनम या शहरांमध्ये नेणार आहे. थेट ग्राहकांमध्ये जाणार आहे.

पर्सनल लोन घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, नाही तर द्यावं लागेल जास्त व्याज

सेलमध्ये काय काय मिळणार?

यात अनेक प्रांतातल्या कारागिरांनी बनलेल्या वस्तू पाहायला मिळतील. गुजरातचं मिरर वर्क, आसामचं बांबूचं सजावटीचं सामान, तामिळनाडूचं तंजोर पेंटिंग्ज, बिहारची खादी, फुलकारी, मधुबनी प्रिंट्स, मल्टी कलर प्लेटेस या वस्तू मिळतील.

कंपनीचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई यांनी सांगितलं, या सेलमध्ये 5 लाखांहून अधिक सेलर्स आहेत. त्यात कारागीर, विणकर, स्टार्टअप्स, मोठे ब्रँड्स यांचा समावेश आहे.

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: amazon
First Published: Sep 16, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...