पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

Petrol,Diesel - पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 11:25 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

मुंबई, 13 सप्टेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यात. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या ट्रेड वाॅरमुळे सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. दिल्लीत पेट्रोल 7 पैसे आणि डिझेल 9 पैसे प्रति लीटर झालंय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटप्रमाणे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथले पेट्रोलचे दर क्रमश: 71.89 रुपये, 77.57 रुपये, 74.62 रुपये आणि 74.70 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेल क्रमश: 65.28 रुपये, 68.46 रुपये, 67.69 रुपये आणि 68.99 रुपये प्रति लीटर आहे.

सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, 'हे' आहेत गुरुवारचे दर

सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

Loading...

सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही 'असं' खरेदी करा Gold

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्हाला हव्यात? 'असा' होणार आहे लिलाव

 बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा LIVE VIDEO; भाविकांचे डोळे पाणावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 13, 2019 11:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...