मुंबई, 12 सप्टेंबर : तुम्हाला पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्हाला हव्या असतील, तर चांगली संधी आहे. लवकरच मोदींना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. त्यांना देशभरातून मिळालेल्या 2700 हून अधिक गिफ्ट्सची लिलाव येत्या 14 सप्टेंबरला होणार आहे. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ही माहिती दिली. एकूण 2772 भेटवस्तूंचा लिलाव अनेक संघटना आणि मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना मिळालेल्या एकूण 2,772 भेटवस्तूंमध्ये पगडी, शाल, चित्रं, तलवारी यांचा समावेश आहे. हा लिलाव ऑनलाइन पोर्टलवर केला जाईल. नॅशनल इन्फाॅर्मेटिव्ह सेंटरनं ते डिझाइन केलंय. या गिफ्टसची किंमत 200 रुपयांपासून 2.50 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल झालं महाग तर डिझेल स्वस्त, ‘हे’ आहेत आजचे दर जानेवारीत 1800 गिफ्टसचा झाला होता लिलाव पंतप्रधानांना मिळालेल्या 1800 भेटवस्तूंचा लिलाव जानेवारीत केला होता. तो 15 दिवस चालला. 4 हजार लोकांनी यात भाग घेतला होता. लिलावात मिळालेले पैसे केंद्र सरकारच्या गंगा सफाई योजना - नमामी गंगेसाठी दिले होते. यावेळीही मिळणारे पैसे या योजनेसाठी पाठवले जातील. ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही ‘असे’ काढू शकता पैसे 4.31 कोटींना लिलाव झाला सूट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूटचा 2015मध्ये लिलाव झाला होता. तो 4.31 कोटींना विकला होता. सूरतचे हिरा व्यापारी लालजी पटेल यांनी तो सूट घेतला होता. त्यावेळीही 450पेक्षा जास्त वस्तू लिलावासाठी ठेवल्या होत्या. पण सर्वात महागडा होता तो सूट. SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या ‘या’ सेवा दरम्यान, गायीचं शेण आणि गोमूत्र यांच्यापासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनासाठी मोदी सरकार अर्ध्यापेक्षा अधिक पैसे देणार आहे. डेअरीबरोबर शेण आणि गोमूत्रापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या स्टार्टअपला सरकार 60 टक्के पैसे देईल. अंतरिम बजेटमध्येच सरकारनं राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्यावेळी 500 कोटी रुपये देण्याची घोषणा झाली होती.राष्ट्रीय कामधेनू आयोग पशुचिकित्सा, पशू विज्ञान, कृषी विश्वविद्यालयाच्या सहकार्यानं काम करेल. ते गायचं पजनन, पालन, जैविक खाद्य, बायोगॅस या गोष्टींत कार्यरत आहेत. VIDEO: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बंधु-भगिनीत जुंपली; केला ‘हा’ गंभीर आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.