सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver - जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 06:02 PM IST

सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, 'हे' आहेत गुरुवारचे दर

मुंबई, 12 सप्टेंबर : कालच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज (12 सप्टेंबर) सोन्याच्या दरात 74 रुपये घसरण झालीय. आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,775 रुपये झाली आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं सोनं स्वस्त झालंय. डाॅलरच्या तुलनेत रुपया 71.30 रुपये झालाय.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोनं 38,775 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमती कमी झाल्या.

सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही 'असं' खरेदी करा Gold

सोन्याप्रमाणे चांदीचा भावही कमी झालाय. दिल्लीत चांदीची किंमत 10 रुपयांनी कमी झालीय. चांदी आता एका किलोला  48,590 रुपये झालीय.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,490 डाॅलर प्रति औंस आहे, तर चांदी 18.10 डाॅलर प्रति औंस आहे. दिल्लीत सोन्याची किंमत 38,849 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 48,600 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

Loading...

मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्हाला हव्यात? 'असा' होणार आहे लिलाव

पटेल म्हणाले, सणासुदीला आणि लग्न समारंभाला सोन्याची मागणी वाढते. अशा वेळी या किमती वाढतील.

तुम्हाला गोल्ड बाॅण्ड खरेदी करायचेत? सरकारी गोल्ड बाॅण्डची नवी सीरिज सोमवार 9 सप्टेंबरपासून सुरू झालीय.  9 ते 13 सप्टेंबरपर्यंत हे गोल्ड बाॅण्ड तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 3,890 रुपये प्रति ग्रॅम आहे. जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील, डिजिटल पेमेंट करतील त्यांना इश्यू प्राइझ 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आरबीआयनं सांगितलं, 'अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाॅण्डचं इश्यू प्राइज 3,840 रुपये प्रति ग्रॅम आहे.'

पेट्रोल झालं महाग तर डिझेल स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली होती. सोन्याचे दागिने खरेदी करणं कमी व्हावं आणि सोन्याच्या खरेदीचा उपयोग बचतीसाठी व्हावा म्हणून हा बाॅण्ड सुरू झाला. सोनं खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा बाॅण्ड घेतला तर करही वाचतो.

VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 12, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...