Home /News /money /

सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही 'असं' खरेदी करा Gold

सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही 'असं' खरेदी करा Gold

Gold - सोन्यात गुंतवणूक कशी करायची ते घ्या जाणून

    मुंबई, 12 सप्टेंबर : सोनं खरेदी करणं ही भारतीयांची पहिली पसंती आहे. गेले काही महिने सोन्याची किंमत वाढतेय. तज्ज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत सोनं महाग होणारेय. म्हणून सोन्यातली गुंतवणूक ही उत्तम मानली जातेय. लोक ETF मध्ये पैसे गुंतवतायत. अनेक भारतीयांनी गेल्या 1 महिन्यात दागिन्यांऐवजी Gold ETF मध्ये पैसे गुंतवलेत. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 145 कोटी झालीय. काही जणांना ETF मध्ये पैसे गुंतवण्याची प्रक्रिया कठीण वाटते. अशांसाठी मोबाइल अॅप आलेत. त्याद्वारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. गुगलनं UPI अॅप Google Pay द्वारे 99.99 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या खरेदीची संधी दिलीय. यात तुम्ही 1 रुपयापर्यंत सोनं खरेदी करू शकता. मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्हाला हव्यात? 'असा' होणार आहे लिलाव Google Pay वर असं खरेदी करा सोनं सर्वात आधी Google Pay अॅप डाउनलोड करा. ते ओपन केलंत की तुम्हाला Gold Vault दिसेल. तुम्हाला हे दिसलं नाही तर New वर क्लिक करून Gold Vault टाइप करा. पेट्रोल झालं महाग तर डिझेल स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर Gold Vault वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बाय, सेल आणि डिलिवरीचा पर्याय समोर येईल. बाय वर क्लिक केलंत की तुम्हाला mg मध्ये सोन्याचा दर समोर येईल. या किमतीत करही आहे. तुम्ही कमीत कमी 1 रुपयांचं सोनं खरेदी करू शकता. तुम्ही किती रुपयांचं सोनं खरेदी करणार आहात ती रक्कम लिहून त्यावर क्लिक करा. सोन्यावर लावलेला कर वेगवेगळा असू शकतो. हा अॅप सर्वात आधी GPS नं तुमचं लोकेशन तपासून घेईल. तुम्हाला लोकेशनसाठी अनुमती द्यावी लागेल. ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही 'असे' काढू शकता पैसे सोनं खरेदीच्या प्रक्रियेत 5 मिनिटापर्यंत सोन्याच्या भावात काही बदल होणार नाहीत. तुम्ही यशस्वीपणे सोनं खरेदी केलीत तर ते Vault मध्ये दिसेल. पेमेंट फेल झालं तर तीन दिवसांत तुमचे पैसे परत मिळतील. सोन खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती रद्द करता येणार नाही. तुम्ही त्याच वेळी त्या भावानं MMTC PAMP वर विकू शकता. VIDEO: वाहतूक कोंडीत शिरले दोन बैल आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा
    Published by:Sonali Deshpande
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या