पेट्रोल झालं महाग तर डिझेल स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - तुमच्या शहरातले पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहा

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 11:17 AM IST

पेट्रोल झालं महाग तर डिझेल स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

मुंबई, 12 सप्टेंबर : पेट्रोलच्या किमतीत आज वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं पेट्रोलच्या किमतीत वाढ झालीय. पेट्रोलचा दर 6 पैसे प्रति लीटर वाढलाय तर डिझेलचा दर 5 पैसे प्रति लीटर कमी झालाय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज दिल्लीत पेट्रोल 71.82 रुपये आणि डिझेल 65.19 रुपये प्रति लीटर झालंय. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथे पेट्रोलचा दर क्रमश: 77.50 रुपये, 74.64 रुपये आणि 74.55 रुपये झालाय. तर कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे डिझेल 67.60 रुपये, 68.37 रुपये आणि 68.91 रुपये प्रति लीटर आहे.

ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही 'असे' काढू शकता पैसे

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

Loading...

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

'हा' व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सरकार देईल अर्ध्यापेक्षा जास्त पैसे

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 12, 2019 11:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...