14 दिवसांनी वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, 'हे' आहेत आजचे दर

14 दिवसांनी वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, 'हे' आहेत आजचे दर

Petro, Diesel - बरेच दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर होत्या. आज त्या वाढल्यात. जाणून घ्या नवे दर

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : पेट्रोल आणि डिझेल आज महाग झालेत. 14 दिवसांनी दोघांच्या किमतीत बदल झालाय. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. राजधानी दिल्ली पेट्रोल आणि डिझेल 5 पैशांनी महाग झालंय. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत ही किंमत 1 पैशानं वाढली आहे. चार महानगरांमध्ये डिझेलची किंमत 5 ते 6 पैशांनी वाढलीय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज (10 सप्टेंबर ) मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोल क्रमश: 71.76 रुपये, 77.45 रुपये, 74.49 रुपये आणि 74.56 रुपये प्रति लीटर भावानं मिळतंय. तर डिझेल क्रमश: 65.14 रुपये, 68.32 रुपये, 67.55 रुपये आणि 68.84 रुपये प्रति लीटर मिळतंय.

सावधान, 24 सप्टेंबरला तुमच्या PF बद्दल होऊ शकतो मोठा निर्णय

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

'इथे' फक्त 100 रुपयांत उघडा खातं, बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

खूशखबर!आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी झालं एकदम स्वस्त, 'हे' आहेत दर

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

VIDEO: युतीचं सरकार आल्यावर कोण होणार मुख्यमंत्री? रामदास आठवले म्हणतात...

Published by: Sonali Deshpande
First published: September 10, 2019, 10:58 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading