'इथे' फक्त 100 रुपयांत उघडा खातं, बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज

'इथे' फक्त 100 रुपयांत उघडा खातं, बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज

Money, Investment - इथे तुम्हाला मोफत एटीएमची सुविधा मिळते

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी भारतीय जनतेला खास गिफ्ट दिली होती. 1 सप्टेंबर 2018 मध्ये मोदी सरकारनं पोस्ट पेमेंट बँक लाँच केली होती. यात पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 3 प्रकारे बचत खाती उघडू शकता. या तीनही खात्यत कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची अट नाही.

या तीनही खात्यांमध्ये सरकारी बँकांच्या तुलनेत जास्त व्याज मिळेल. ते 5.5 टक्के असेल. या तीन खात्यांमध्ये नियमित सेव्हिंग्स अकाउंट आणि दोन प्रकारची बेसिक सेविंग्स डिपाॅझिट अकाउंट्स असतील. या खात्यांबद्दल जाणून घेऊ.

सफल खातं - तुम्ही 10 वर्षांचे किंवा त्याहीपेक्षा जास्त वयाचे आहात तर फक्त 100 रुपये जमा करून खातं उघडू शकता. इथे तुम्हाला मोफत डेबिट कार्ड मिळेल. या खात्यात तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त बॅलन्स ठेवू शकत नाही.

खूशखबर!आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी झालं एकदम स्वस्त, 'हे' आहेत दर

सुगम खातं - इथेही 10वर्षापासूनच्या व्यक्ती खातं उघडू शकतात. कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची अट नाही. 1 लाख रुपयांपर्यंतच पैसे खात्यात ठेवू शकता. डेबिट कार्ड मोफत मिळेल आणि नाॅमिनेशन फॅसिलिटीही मिळेल.

सरल खातं - इथेही 10वर्षापासूनच्या व्यक्ती खातं उघडू शकतात. केवायसी डिटेल्स द्यावे लागतील. यात कमीत कमी बॅलन्सची अट नाही. पण 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही. तुम्हाला मोफत एटीएम आणि नाॅमिनेशन सुविधा मिळेल.

आधार कार्डात बदल करायचा असेल तर 'अशी' घ्या ऑनलाइन अपाॅइंटमेंट

घरपोच सेवा

या तीनही खात्यांची सेवा तुम्हाला घरपोच मिळेल. त्यासाठी 15 ते 35 रुपये भरावे लागतील.

कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल

अनलिमिटेड एटीएम ट्रॅन्झॅक्शन

इंडिया पोस्ट एटीएमद्वारे तुम्ही मोफत व्यवहार करू शकता. मेट्रो शहरात तुम्ही इतर बँकांच्या एटीएममध्ये 3 ट्रॅन्झॅक्शन्स मोफत करू शकता. नाॅन मेट्रो शहरांसाठी 5 ट्रॅन्झॅक्शन्स फ्री आहेत.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा

Published by: Sonali Deshpande
First published: September 9, 2019, 6:37 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या