सावधान, 24 सप्टेंबरला तुमच्या PF बद्दल होऊ शकतो मोठा निर्णय

PPF, NPS - तुमच्या PF बद्दल एक मोठी निर्णय होणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 07:21 PM IST

सावधान, 24 सप्टेंबरला तुमच्या PF बद्दल होऊ शकतो मोठा निर्णय

मुंबई, 09 सप्टेंबर : तुम्ही तुमचे PF चे पूर्ण पैसे एनपीएस (NPS)द्वारे स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवू शकता. असा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. इतकंच नाही तर तुम्ही नवी नोकरी पत्करलीत, तर तुम्हाला कुठली ईपीएफ स्कीम हवी म्हणून विचारलंही जाईल. सरकारनं या प्रस्तावाचा ड्राफ्ट तयार केलाय. 24 सप्टेंबर रोजी यावर निर्णय घेण्यासाठी बैठक आहे. नॅशनल पेंशन स्कीम म्हणजेच NPS एक सरकारी निवृत्ती स्कीम आहे. केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2004 रोजी लाँच केलं होतं. या तारखेनंतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही स्कीम अनिवार्य आहे. 2009नंतर ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही सुरू केली होती.

काय आहे स्कीम?

पीएफचे पैसे एनपीएसमध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय तुम्हाला मिळेल. याद्वारे हे पैसे स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवले जातील. नव्या नोकरीत तुम्हाला फक्त ईपीएफ नाही तर एनपीएसचाही पर्याय मिळेल. हा निर्णय 24 सप्टेंबर 2019ला होईल.

'इथे' फक्त 100 रुपयांत उघडा खातं, बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज

NPS मध्ये गुंतवणूक केल्यानं करातही सवलत मिळते. 1.5 लाख रुपयांच्या टॅक्सची ही सवलत मिळते. शिवाय कलम 80CCD (1B)प्रमाणे अतिरिक्त 50 हजार रुपयांच्या कपातीचा फायदा मिळतो. निवृत्तीनंतर जास्त फायदा हवा असेल तर EPF तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS)मध्ये ट्रान्सफर करू शकता.

Loading...

खूशखबर!आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी झालं एकदम स्वस्त, 'हे' आहेत दर

त्यासाठी तुमच्याकडे NPSचं अकाउंट हवं. ते चालू असावं. तुम्ही NPSच्या पोर्टलवर जाऊन नवं अकाउंट उघडू शकता. NPS अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही npstrust.org.in इथे क्लिक करा.

आधार कार्डात बदल करायचा असेल तर 'अशी' घ्या ऑनलाइन अपाॅइंटमेंट

NPS अकाउंट उघडल्यावर तुम्ही EPF ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर EPFचे पैसे NPSमध्ये ट्रान्सफर होईल. PF अकाउंट NPSमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करेल.

VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: PPF
First Published: Sep 9, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...